घरक्राईमनामाविमानाचे आपत्कालीन दार उघडण्याचा प्रयत्न

विमानाचे आपत्कालीन दार उघडण्याचा प्रयत्न

कोचीत प्रवाशाला अटक

- Advertisement -

कोचीकडे येणाऱ्या बॅटिक एअरच्या विमानात उड्डाणादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. मलेशियातील क्वालालंपूरहून कोचीकडे येत असताना एका प्रवाशाने विमानाचे आपत्कालीन (इमर्जन्सी) दार उघडण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विमान कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि इतर प्रवाशांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी अचानक आपल्या सीटवरून उठला आणि इमर्जन्सी एक्झिटच्या दिशेने धावत जाऊन दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या विमान कर्मचाऱ्यांशी त्याने हुज्जत घातली. या गोंधळात इमर्जन्सी दारावरील पॅनेलचेही नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच केबिन क्रूने तातडीने हस्तक्षेप केला आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्या व्यक्तीला नियंत्रणात आणले.
हे ही वाचा:
‘जेन झी’ चा आवाज ऐकला गेला पाहिजे

‘शहा’निशा सुरू झाली, फंडिंगचे पुरावे समोर आले…

बनावट कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही!

पीओकेतील हिंसाचार लपवण्यासाठी परदेशी पत्रकारांवर कठोर निर्बंध

यानंतर विमान नियोजित वेळेनुसार सुरक्षितपणे कोची विमानतळावर उतरवण्यात आले. विमानतळावर उतरताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि स्थानिक पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले. विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, विमान कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडली नाही. उड्डाणादरम्यान अशा प्रकारचे कृत्य अत्यंत गंभीर मानले जाते, कारण त्यामुळे शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रवाशाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून, त्याच्या या कृत्यामागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version