घरक्राईमनामाड्रग्स विक्रेत्याचे डोके फिरले केली मित्राचीच हत्या

ड्रग्स विक्रेत्याचे डोके फिरले केली मित्राचीच हत्या

पोलिसांनी केली अटक

ड्रग्सच्या धंद्यातून झालेल्या वादात एका ड्रग्स विक्रेत्याने दुसऱ्या ड्रग्स विक्रेत्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना कुर्ला पश्चिम येथे घडली. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून एका ड्रग्स विक्रेत्याला अटक केली आहे.

हे ही वाचा:

३० तासाच्या शोधानंतर कोल्हापूर सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेले मुंबईत

अमरिंदरसिंग यांच्या पत्नींना काँग्रेस पक्षाने दिला डच्चू

चुनाभट्टीतील तरुणाच्या हत्येचा लागला छडा, हे होते कारण…

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

लिमो असे हत्या करण्यात आलेल्या ड्रग्स विक्रेत्याचे नाव असून नजीम उर्फ काटा याला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कुर्ला पश्चिम रामबचन चाळ या ठिकाणी राहणारे लिमो आणि नजीम हे परिसरातच एमडी हा अमली पदार्थ (ड्रग्स) विकायचे. दोघांचा भागीदारीत ड्रग्सचा व्यवसाय होता, या ड्रग्सच्या व्यवसायातून दोघात वाद झाला या वादातून गुरुवारी रात्री नजीम याने लीमोची भोसकून हत्या केली. त्यानंतर नजीम हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने आत्मसमर्पण केले. विनोबा भावे नगर पोलिसानी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून नजीम याला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version