घरक्राईमनामा२ हजाराच्या बनावट नोटा छापत होते; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

२ हजाराच्या बनावट नोटा छापत होते; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

- Advertisement -

मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक केली आहे. दहिसर परिसरातून पोलिसांनी या टोळीला ताब्यात घेतले. पोलिसांनी यांच्याकडून सात कोटी रुपये, कागदपत्रे आणि इतर ऐवज जप्त केला. सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई शहरात बनावट नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण प्रकारची माहिती काढली. दरम्यान, चार व्यक्ती २ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचे पोलिसांना कळले.

माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचे २५० बंडल आढळून आले. या बंडलमध्ये २ हजार रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे

युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’

आरोपींची कारवाई दरम्यान झडती घेतल्यावर पोलिसांना सात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आणि २८ हजार १७० रोख रक्कम सापडली आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे आरोपी बनावट नोटा छापून त्यांचे वितरण करत होते. या प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version