घरक्राईमनामारिक्षातून 'ती' गोणी घेऊन उतरणाऱ्या तरुणी गावल्या पोलिसांच्या तावडीत

रिक्षातून ‘ती’ गोणी घेऊन उतरणाऱ्या तरुणी गावल्या पोलिसांच्या तावडीत

पोलिसांनी २४ तासांत लावला छडा

कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील नाल्यात गोणीत सापडलेल्या मृतदेहांप्रकरणी तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघींपैकी एकीच्या पतीसोबत मृत तरुणीचे प्रेमप्रकरण सुरू होते व या प्रेमप्रकरणातून तिची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

मृत तरुणी ही १६ वर्षांची असून नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास होती. तसेच ताब्यात असलेल्या महिला चेंबूर माहुल गाव येथे राहणाऱ्या आहेत.बुधवारी दुपारी कुर्ला पूर्व येथील बंटर भवन या ठिकाणी असलेल्या नाल्यात नेहरू नगर पोलिसांना एका गोणीत तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. मृतदेह कुजलेला असल्यामुळे मृत तरुणीची ओळख पटत नव्हती. नेहरू नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका रिक्षातून दोन महिला गोणी घेऊन उतरत असल्याचे दिसून आले.

दरम्यान तपास पथकाने रिक्षाचा शोध घेऊन रिक्षा चालकाला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता दोन महिला प्रवासी यांना तो माहुल गाव येथून घेऊन आल्याचे त्याने सांगितले. रिक्षाचालकाने दिलेल्या वर्णन आणि भाडे कुठून घेतले या पत्त्यावरून पोलिसांनी दोन महिलांना गुरुवारी संशयावरून ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा:

उद्धवजी, दीड वर्षाच्या मुलाचा नगरसेवकपदावर डोळा असं वक्तव्य केलंत तुम्ही?

झेल सुटले आणि सामनाही निसटला

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८० कोटींचे हेरॉईन जप्त

ठाकरेंच्या घराणेशाहीवर शिंदेंचा बाण

 

त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता मृत तरुणी ही १६ वर्षाची असून ती आई वडिलांसोबत नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास होती अशी माहिती समोर आली. ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिलेच्या पतीसोबत .या मृत झालेल्या तरुणीचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यातून या महिलेने परिसरातील काही मैत्रिणीची मदत घेऊन या तरुणींची हत्या करून मृतदेह गोणीत कोंबून तो नेहरू नगर येथील नाल्यात फेकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पोलीस सुत्राच्या म्हणण्यानुसार मृत तरुणीच्या तक्रारी वरून नेहरू नगर पोलिसांनी एका ५० वर्षीय व्यक्तीवर पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version