घरक्राईमनामामास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

पोलिसांनी कारवाई करत आवळल्या मुसक्या

ऐकावे तेवढे नवलच. पहिले मास मीडियाचे शिक्षण नंतर नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नोकरी आणि शेवट डान्सबारच्या नादाने घरफोडी. कल्याणनजीक मोहने परिसरात एका चोरट्याने घरफोडी केली होती. या घरफोडीत ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले. अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपी रोशन जाधवच्या मुसक्या आवळल्या.

रोशन जाधव हा उच्यशिक्षित तरुण असून याने पहिले मास मीडियाचे शिक्षण घेतले नंतर नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात नोकरीला लागला. या दरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला. डान्सबारच्या नादामुळे पैसे पुरत नसल्याने घरफोडी करण्यास सुरुवात केली. चोरी केलेला पैसा डान्सबारमध्ये उडवायचा.अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

हे ही वाचा:

जेनेरिक आधार स्वस्त औषधांसाठी देशभरात १०,००० मेडिकल स्टोअर उघडणार

दर्शन सोळंकीची आत्महत्या आणि गप्प राहिलेली माध्यमे!

राहुल गांधींच्या विरोधात ‘सावरकर’ न्यायालयात

उत्तर प्रदेशचा खतरनाक गुंड अतीकचा मुलगा असदचे एन्काऊंटर

पोलिसांनी ४७ तोळे सोने,मोबाइल, लॅपटॉप त्याच्याकडून हस्तगत केले.आरोपी रोशन जाधव अशा ठिकाणी चोरी करायचा ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसायचे त्यामुळे चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.

खडकपाडा पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ ,सहायक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरु केला.पोलिसांनी घटनास्थळापासून जवळपासचे सीसीटीव्ही तपासले सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरटा रोशन याला अटक केली.त्याने आंबिवली,टिटवाळा,शहापूर या भागात घरफोडीचे आठ गुन्हे केले हे स्पष्ट झाले.त्याच्याकडून पोलीसांनी ४७ तोळे सोने,लॅपटॉप,मोबाइल इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या.आरोपी रोशन हा दिवसा इमारतींची रेकी करायचा ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही,सीसीटीव्ही नाही अश्या ठिकाणी रात्री त्या इमारतीत जाऊन घरफोडी करायचा.अखेर तो सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version