घरक्राईमनामागरब्यात 'रेंट अ पार्टनर'चा बाजार

गरब्यात ‘रेंट अ पार्टनर’चा बाजार

नागरिकांमध्ये संताप; भाजप आमदाराने केली कारवाईची मागणी

- Advertisement -

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या ‘Rent a Garba Partner’ (गरबा पार्टनर भाड्याने मिळणे) या नावाखाली फिरणाऱ्या जाहिरातींमुळे मोठा विवाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बोरीवली विधानसभेचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच बोरीवली आणि दहिसर परिसरातील पोलीस उपाध्यक्षांना पत्र लिहून चौकशी व कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर नवरात्रीदरम्यान गरबा खेळण्यासाठी पार्टनर पुरवण्याच्या नावाखाली विविध आकर्षक पॅकेजेस (सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम, डायमंड) जाहीर करणाऱ्या जाहिराती व्हायरल होत आहेत. यामध्ये ₹१,००० ते ₹६,५०० पर्यंतचे दर आकारून गरबा शिकवणे, मॅचिंग कपडे घालणे, सोशल मीडियासाठी रील्स-फोटो काढणे, तसेच काही जाहिरातींमध्ये वैयक्तिक सुरक्षेची व सहवासाची आश्वासने दिली जात आहेत.

आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की:
बोरीवली विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण मुंबईत ‘Rent a Garba Partner’ या नावाखाली युवक-युवतींना १,००० ते ६,५०० रुपयांत पार्टनर म्हणून उपलब्ध करून देण्याचे प्रकार समोर आले आहेत.

हे ही वाचा:

पश्चिम रेल्वेच्या ९ जोड्या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

सिम कार्डच्या गैरवापरावर ३ वर्षांचा तुरुंगवास

कबड्डीत भारताने जपानचा उडवला धुव्वा!

सुचिकाचा ऐतिहासिक पंच

या उपक्रमातून कायद्याचे उल्लंघन, महिलांची फसवणूक, गैरप्रकार किंवा कोणतेही अनैतिक व बेकायदेशीर कृत्य घडत असल्यास त्याची तात्काळ गंभीर दखल घेऊन चौकशी केली जावी.

संबंधित आयोजक, जाहिरातदार आणि जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.

अशा प्रकारच्या जाहिराती व उपक्रमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून परिसरातील महिला व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत.

या प्रकरणाचा तपास करून केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

पारंपारिक आणि धार्मिक सणाच्या वातावरणात अशा प्रकारच्या ‘भाड्याने पार्टनर’ पुरवणाऱ्या जाहिरातींमुळे गैरप्रकार आणि महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करून काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version