घरक्राईमनामाशिवा राठोड झालेल्या आरिफने चेंबूरमध्ये मुलीवर केले अत्याचार

शिवा राठोड झालेल्या आरिफने चेंबूरमध्ये मुलीवर केले अत्याचार

गुन्हा दाखल, धर्मांतराची केली सक्ती

शिवा राठोड हे हिंदू नाव सांगून एका २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंतर या तरुणाचे नाव आरिफ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात आरीफ उर्फ शिवा राठोड या तरुणाविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चेंबूर येथील एका बांधकाम व्यावसायिक कार्यालयात टेलिकॉलिंगचे काम करणाऱ्या २० वर्षीय तरुणीची जानेवारी २०२५ मध्ये तेथेच दलाल (ब्रोकर) म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली होती. त्या तरुणाने आपले नाव ‘शिवा राठोड’ असल्याचे सांगितले होते. काही दिवसांतच त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. मात्र, काही महिन्यांनंतर त्याच्या मित्रांनी त्याला ‘आरीफ’ अशी हाक मारल्याने त्याचे खरे नाव आरीफ शेख असल्याचे व तो विवाहित असल्याचे समोर आले.

गुंगीचे औषध देऊन अत्याचार व ब्लॅकमेलिंग…..

तक्रारीनुसार, वाशी येथील एका लॉजवर नेऊन आरीफने तरुणीला प्रसाद असल्याचे सांगून गुंगीचे औषध दिले व तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून ते घरच्यांना दाखवण्याची व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ऑगस्ट २०२६ मध्ये तरुणीने विरोध केला असता तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

हे ही वाचा:

ब्रिक्समध्ये भारताचा डिजिटल पेमेंटवर भर

एनएसईच्या आयपीओ २२,६०० कोटींवर

चाकरमान्यांसह गडकरींनाही मुंबई-गोवा महामार्गाचा ताप !

अर्थक्षेत्रातील पोंगा पंडितांना नागडे करणारा अहवाल..

धर्मांतर आणि कर्जाची मागणी

जुलै २०२६ मध्ये तरुणीने आरोपीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन जाब विचारला असता, आरीफच्या कुटुंबीयांनी तिला लग्न करायचे असल्यास ‘मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल’ अशी अट घातली. याशिवाय आरीफचे १० लाख रुपयांचे कर्ज फेडण्याची मागणी करत तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने एका हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी प्रथम शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४ (बलात्कार), ६४(२)(m), ६९ (ओळख लपवून किंवा लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध), ११५(२), १२३, ३५१(३), ३५२, ३५६(२), ७५(१) आणि ७८(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून हा गुन्हा चेंबूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला असल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी दिली, तसेच या प्रकरणी आरोपी शिवा उर्फ आरिफ याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version