घरक्राईमनामाजेवण बनवले नाही, म्हणून आईचा जीव घेतला!

जेवण बनवले नाही, म्हणून आईचा जीव घेतला!

वरळीत २७ वर्षीय मुलाकडून आईच्या पोटात ठोसे

- Advertisement -

जेवण बनवले नाही या कारणावरून झालेल्या वादातून २७ वर्षीय मुलाने आईला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना वरळीतील प्रेमनगर परिसरात घडली. या प्रकरणी वरळी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

वरळीतील प्रेमनगर, बी. जे. खैर मार्गावरील बॉम्बे हॉ कंपाउंड परिसरात २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १.३० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान आरोपी मुलाने आपल्या आईला तिच्या बहिणीच्या घरातून बाहेर आणले. त्यानंतर बी. जे. खैर मार्गावरील साई टेलर्ससमोर त्याने आईशी वाद घातला.

हे ही वाचा:

ज्ञानेशकुमार, २४ तासात राजीनामा द्या, नाहीतर २ ऑक्टोबरपासून आंदोलन

बिहारच्या मंदार हिलवर महिलेला विनयभंगानंतर मारहाण

शेवटच्या क्षणी जोडी बदलली अन् भारताला नेमबाजीत सुवर्ण!

“पेजर आठवतात का?” नेतन्याहूंनी पेजर दाखवत हिजबुल्लाहला विचारला प्रश्न

‘जेवण का बनवले नाही?’ असा जाब विचारत आरोपीने आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने आईच्या पोटात हाताने जोरदार ठोसे मारले. या मारहाणीत महिलेला गंभीर अंतर्गत दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी तपास सुरू केला. मयत महिलेच्या ५० वर्षीय बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version