घरक्राईमनामाइसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी उच्चशिक्षित; केमिकल्ससाठी होते खास कोडवर्ड

इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवादी उच्चशिक्षित; केमिकल्ससाठी होते खास कोडवर्ड

एनआयएच्या आरोपपत्रातून धक्कदायक खुलासे

पुणे शहरातील इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आले आहे. यात इसिस मॉड्यूल प्रकरणी धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. पुणे इसिस मॉड्यूल प्रकणातील दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, असा धक्कादायक खुलासा आरोपपत्रातून करण्यात आला आहे. याशिवाय आणखी काही धक्कादायक खुलासे आरोपपत्रातून समोर आले आहेत.

इसिस मॉड्यूल प्रकरणातील सर्व दहशतवादी हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज होते. या प्रकरणातील आरोपी जुल्फीकार अली हा एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वार्षिक ३१ लाख रुपये पगार होता, अशी माहिती आरोपपत्रातून एनआयएने दिली आहे. तसेच उर्वरित आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता. त्याला स्फोटकांचे चांगले ज्ञान होते. त्याचा वापर करुन त्याने बॉम्बची निर्मिती केली, असे एनआयएने म्हटले आहे.

आरोपी कादीर पठाण हा पुणे येथे ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. त्याने सोबत असणाऱ्या इम्रान खान आणि युनूस साकी यांनाही ग्राफिक्स शिकवले होते. ओळख लपून राहावी म्हणून ग्राफिकची कामे करुन ते पैसे कमवत होते, असे एनआयएने म्हटले आहे. आरोपींनी आयईडी स्फोटक बनवण्यासाठी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या. ज्यामध्ये काही केमिकल्स होती. या केमिकल्ससाठी ते कोडवार्डचा वापर करत होते.

हे ही वाचा:

झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!

एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!

केमिकल्ससाठी कोडवर्ड

सल्फरिक एसिडसाठी विनेगर हा कोडवर्ड दहशतवाद्यांनी ठेवला होता. तर, असेटॉन केमिकल्ससाठी रोजवॉटर हा कोडवर्ड ठेवला होता. हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत हा कोडवर्ड होता. या प्रकरणातील आरोपींना मोहम्मद नावाचा एक हँडलर ऑपरेट करत होता. शिवाय आयईडी बॉम्ब बनवण्याच काम आरोपींकडून युद्धपातळीवर सुरु होते, असे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version