घरविशेषपश्चिम रेल्वेवर मध्यरात्री बोरीवली-भाईंदरदरम्यान जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री बोरीवली-भाईंदरदरम्यान जम्बो ब्लॉक

लोकलच्या वेळापत्रकात बदल

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना असून, ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार, ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान राबवण्यात येईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अप आणि डाउन जलद मार्गांवर रात्री ११ वाजून ३० मिनिटांपासून पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल.

या ब्लॉकचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवांवर होणार आहे. विरार, वसई रोड आणि बोरीवलीदरम्यान धावणाऱ्या सर्व जलद मार्गावरील लोकल गाड्या ब्लॉकच्या कालावधीत धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित मार्गावरील प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागू शकतो. याशिवाय काही अप आणि डाउन दिशेच्या उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची सविस्तर यादी संबंधित उपनगरीय स्थानकांवरील स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू

देशात अफरातफर माजवून बदनाम करण्याचा काही लोकांचा डाव

‘सार्वजनिक महाभियोगा’वर पावसाचे पाणी z

प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून बाहेर

दरम्यान, रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिवसा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, मध्यरात्रीच्या जम्बो ब्लॉकमुळे रात्री उशिरा आणि पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे. देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरक्षित व सुरळीत रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version