घरविशेषविमल पान मसाला जाहिरात प्रकरणात अजय देवगणची हायकोर्टात धाव

विमल पान मसाला जाहिरात प्रकरणात अजय देवगणची हायकोर्टात धाव

तुकाराम मुंढेंचा कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार

विमल पान मसाल्याच्या जाहिरातीवरून सुरू असलेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बजावलेल्या नोटिशीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, या याचिकेमुळे प्रशासनाची कारवाई थांबणार नसल्याचे एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे.

विमल इलायचीच्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रतिबंधित पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा एफडीएला संशय आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित कलाकारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसांना कलाकारांनी उत्तरे दिली असून, आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळही मागितला होता. जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेल्या उत्पादनाचे स्वरूप, त्यातून होणारा प्रचार आणि अन्नसुरक्षा नियमांचे संभाव्य उल्लंघन या मुद्द्यांवर प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली.
हे ही वाचा:
२०२७ पासून बाजारात येणार १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा

ब्रेकअप केला म्हणून बलात्काराचा गुन्हा ठरणार नाही!

सोमनाथ मंदिर परिसरातील मांसाहार विक्रीवरील बंदी रद्द

आली रे आली हिशेबाची वेळ आली!

एफडीएच्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व कायदेशीर सुनावण्या पूर्ण झाल्या असून सक्षम अधिकारी असलेल्या सहाय्यक आयुक्तांनी सुनावणी बंद केली आहे. आता पुढील निर्णय आणि संभाव्य दंडात्मक कारवाईसाठी संपूर्ण प्रकरण सहआयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे. अजय देवगणने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली, तरी त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया थांबणार नाही. कायद्यानुसार निष्पक्षपणे पुढील कारवाई केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील अन्नसुरक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कठोर करण्यासाठी एफडीएकडून १५ महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अन्न व्यावसायिकांनी कोणत्या नियमांचे पालन करावे, नागरिकांचे अधिकार काय आहेत आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई होऊ शकते, याबाबत या आदेशांमधून स्पष्टता आणण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसोबतच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. त्यामुळे अजय देवगणच्या याचिकेवर उच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि एफडीएच्या पुढील कारवाईत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version