घरक्राईमनामाउघड्यावर दारू पिऊ दिली नाही म्हणून केली मारहाण, नौदलाच्या तीन सेलरना अटक

उघड्यावर दारू पिऊ दिली नाही म्हणून केली मारहाण, नौदलाच्या तीन सेलरना अटक

वाईन्स शॉप जवळ उघड्यावर मद्य पिण्यास मना करणाऱ्या स्थानिक नागरिकांना नौदलाच्या पाच पेक्षा जास्त असलेल्या सेलरनी दारूच्या नशेत मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या मारहाणीत एका नागरिकाच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. हा प्रकार फोर्ट येथील पी. डिमेलो रोड वरील प्रजापती वाईन्स शॉप येथे घडली. एमआरए मार्ग पोलिसांनी तीन सेलर यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

नौदलाचे सेलर गुरुवारी मुंबई बंदरात आल्यानंतर त्यापैकी तिघे जण मुंबई बंदरापासून काही अंतरावर असलेल्या प्रजापति वाईन्स शॉप या ठिकाणी आले. त्यांनी वाईन्स शॉप मधून दारूच्या बॉटल घेऊन उघड्यावरच दारू पिण्यास सुरुवात केली. तेथील स्थानिक नागरिकांनी त्यांना उघड्यावर दारू पिण्याबाबत आक्षेप घेतला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. तिघांपैकी एकाने आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले व त्याठिकाणी पाच पेक्षा जास्त नौदलाचे सेलर गोळा झाले व त्यांनी नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशींचे निधन

सेक्युलरिझमचे स्तोम पुरे; “हिंदू धर्म” हा देशाचा प्रमुख धर्म हवा!

शरद पवार अहिल्यादेवींना खरोखरच मानतात का?

 

या मारहाणीत एका नागरिकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच एमआरए मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच नौदलाच्या सेलरनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघेजण पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी दिली.

शिवम मुकेश, नितीन कपूर सिंग आणि सत्येंद्र सिंग ऐलावत असे अटक करण्यात आलेल्या तिघांचे नावे असून पळून गेलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्याचा शोध सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version