महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्या पुढाकाराने ₹८३ लाखांचे भरीव योगदान देण्यात आले आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या पुढाकाराने आणि आकुर्ली सेवा फाउंडेशन आयोजित ‘रमझात नवरात्रोत्सव २०२६’ निमित्त अशोकनगर येथील लाल माती मैदानावर आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी त्यांनी अंबे मातेचे दर्शन घेऊन उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यसम्राट आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत. यापुढेही जनतेच्या हितासाठी होणाऱ्या विकासकामांना राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य राहील. यावेळी आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, कांदिवली पूर्व मतदारसंघातील आकुर्ली भुयारी मार्गाचे रुंदीकरण तसेच मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड खुला करण्यासारख्या महत्त्वपूर्ण विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, ज्यामुळे मतदारसंघातील विकासप्रकल्पांना गती मिळाली आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींचे पुन्हा ‘मिलते है ब्रेक के बाद…’
मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!
अल्प प्रतिसादामुळे कॉक्रोच आंदोलन दिवाळीनंतर
महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण संकट असताना सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याच सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹८३ लाखांचा निधी संकलित करून देण्यात आला. यापुढेही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत अधिकाधिक योगदान दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी भातखळकर यांनी दिली. या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व देणगीदारांचे मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमाला आमदार योगेश सागर, भाजप जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, कांदिवली पूर्व मतदारसंघातील नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
