घरक्राईमनामा१.३० कोटींच्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

१.३० कोटींच्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

'महाराष्ट्र सायबर'ची धडक कारवाई

शेअर बाजारात भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने दोघांना अटक केली आहे। श्वेता विकल गुप्ता (वय ४१) आणि योगेश विवेकानंद देसाई (वय ४६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। विशेष म्हणजे, सायबर पोलिसांनी तातडीने आर्थिक व्यवहारांचा माग काढून फसवणूक झालेल्या रकमेपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम विविध बँक खात्यांमध्ये गोठवून (फ्रीझ करून) सुरक्षित करण्यात यश मिळवले आहे। ही रक्कम कायदेशीर प्रक्रियेनंतर मूळ तक्रारदाराला परत मिळवून दिली जाणार आहे।
उच्चशिक्षित आरोपींचा ‘मनी म्यूल’ म्हणून वापर
तपासामध्ये समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेली महिला आरोपी श्वेता गुप्ता ही एमबीए (MBA) पदवीधर आहे, तर पुरुष आरोपी योगेश देसाई हा एका नामांकित विमा कंपनीत वरिष्ठ कार्यकारी (Senior Executive) पदावर कार्यरत आहे। उच्चशिक्षित आणि चांगल्या पदांवर कार्यरत असूनही, त्यांनी आपले बँक खाते सायबर गुन्हेगारांना ‘मनी म्यूल’ (फसवणुकीचे पैसे फिरवण्यासाठीचे खाते) म्हणून वापरण्याची परवानगी दिली होती। या दोघांच्या खात्यांवर फसवणुकीच्या रकमेपैकी ३० लाख रुपये जमा झाले होते, जे त्यांनी पुढे इतर खात्यांवर वळवून पैशांचे हस्तांतरण (लेयरिंग) सुलभ केले होते।
हे ही वाचा:
‘बोरा’बिस्तरा गुंडाळून सगळे फरार!

इंजीनिअरिंगचे शिक्षण नाही; पण तयार केली उडती कार

म्यानमार शस्त्र प्रशिक्षण प्रकरण; सात परदेशी नागरिकांना भारताबाहेर राहण्याची मुदतवाढ

चुलत्याच्या घरातून १५ तोळे सोने चोरुन विकत घेतली थार
देशभरातील ९ गुन्ह्यांशी धागेदोरे उघड
या खात्यांची सखोल तपासणी केली असता, हे बँक खाते केवळ याच गुन्ह्यात नव्हे, तर दिल्ली, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी आणि त्रिपुरा या राज्यांत दाखल असलेल्या इतर ९ सायबर गुन्ह्यांशीही जोडलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे। यामुळे हे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून, महाराष्ट्र सायबर या संपूर्ण साखळीचा आणि मुख्य सूत्रधारांचा कसून शोध घेत आहे।
या प्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act), २००० च्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे।

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version