घरक्राईमनामाललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्स बडतर्फ

ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्स बडतर्फ

कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोघांचे नाव असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.

पुण्यातील ड्रग माफीया ललित पाटील ससुन रुग्णालयातून १ ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता, तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढण्यात आले आहेत.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कदायक बाबी समोर येत आहेत. ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम चांगलाच चर्चेत आला आहे. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला होता. ससून रुग्णालयात ललित पाटील याला पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे सर्व सुविधा मिळत होत्या अशी माहिती समोर आली होती.

हे ही वाचा:

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नाहीत!

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे हौथी दहशतवाद्यांकडून अपहरण

ललित पाटील हा उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात राहत होता. पण, ललित पाटील हा ड्रग्स प्रकरणातील कैदी तीन वर्षांत रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आराम करत होता. शिवाय त्याच्या मर्जीने हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी ललित पाटील महिन्याला १७ लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली आहे. १६ नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो हे पैसे देत होता. ललित पाटीलच्या या सुविधा पाहता त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता होती. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. त्यात आता दोन कर्मचाऱ्यांना अटक करून बडतर्फ करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version