बांगलादेशात राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. नरैल जिल्ह्यातील कालिया उपजिल्ह्यात दोन बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्यांची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने अवामी लीगच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरांना लक्ष्य केले. या हिंसाचारात ५० हून अधिक घरांना आग लावण्यात आली असून अनेक दुकानांची तोडफोड आणि लूटमार करण्यात आली आहे. शुक्रवार (२० नोव्हेंबर) दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत हा प्रकार सुरू होता.
माहितीनुसार, बेंदर चार गावात माजी खासदार कबिरुल हक मुक्ती आणि माजी नगराध्यक्षांसह अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आगीत २० ते २५ कुटुंबांमधील ५० हून अधिक निवासी बांधकामे जळून खाक झाली. मात्र, स्थानिक प्रशासनाने १५ ते २० घरांची तोडफोड झाल्याचे आणि काही घरांना आग लावल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी बीएनपीच्या मोटारसायकल रॅलीवर झालेल्या हल्ल्यात दोन नेत्यांचा मृत्यू झाला होता. शाहिनुर मोल्ला आणि सोहेल मोल्ला अशी त्यांची नावे आहेत. या हल्ल्यामागे अवामी लीगच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप बीएनपीने केला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या डिसेंबरमध्ये संभाव्य मायदेशी परतण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यामुळे या हिंसाचारामुळे राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी तरुणाला अटक
इस्रायलवरील राहुल गांधींच्या वक्तव्यावरून पिनराई विजयन संतापले
गोल्डी ब्रार एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत
संविधानाचे पुस्तक दाखवणाऱ्या काँग्रेसची ‘मेटा’ कार्यालयात तोडफोड
अवामी लीगच्या समर्थकांची घरे लक्ष्य
बांगलादेश स्टुडंट्स लीगचे अध्यक्ष हुसेन सद्दाम यांनी दावा केला आहे की, स्थानिक बीएनपी कार्यकर्त्यांनी हिंदू अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांसह आवामी लीग समर्थकांची शेकडो घरे जाळली, तोडफोड केली आणि लुटली. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, सद्दामने या हल्ल्यांचा संबंध दोन दिवसांपूर्वी संसदेतील समारोपाच्या भाषणात बीएनपी नेते तारिक रहमान यांनी केलेल्या वक्तव्याशी जोडला, ज्यामध्ये त्यांनी कथितरित्या म्हटले होते की, अवामी लीग पुन्हा उभी राहण्यापूर्वीच तिचे शीर चिरडून टाकायचे आहे. सद्दाम म्हणाले की, हे हल्ले राजकीय वक्तृत्वाचे प्रकटीकरण होते आणि त्यांनी सरकारवर राजकीय विरोधकांचा छळ केल्याचा आरोप केला. तसेच, या घटनांचे पुरेसे वार्तांकन न केल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांवर टीकाही केली.
