घरक्राईमनामाजम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी तरुणाला अटक

जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी तरुणाला अटक

बीएसएफकडून कारवाई

जम्मू-काश्मीरमधील जम्मू जिल्ह्यातील अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेतले आहे. अवैस रजा (वय २०) असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील जरनवाली येथील रहिवासी आहे.

माहितीनुसार, शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अरनिया सेक्टरमधील एका सीमावर्ती गावात हरापीर पुलाजवळ तो संशयास्पद अवस्थेत आढळला. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडले. त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. सीमेवरील कुंपण ओलांडून तो भारतीय हद्दीत कसा आला आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास जम्मू-काश्मीर पोलीस आणि बीएसएफकडून केला जात आहे.

हे ही वाचा:

इस्रायलवरील राहुल गांधींच्या वक्तव्यावरून पिनराई विजयन संतापले

गोल्डी ब्रार एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत

संविधानाचे पुस्तक दाखवणाऱ्या काँग्रेसची ‘मेटा’ कार्यालयात तोडफोड

सरकारी पोर्टल हॅक करून अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दाट धुके, दुर्गम भाग किंवा रस्ता चुकल्यामुळे अनेकदा नागरिकांकडून अनवधानाने सीमा ओलांडली जाते. अशा व्यक्तींची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी आणि पार्श्वभूमीची तपासणी केली जाते. सीमा चुकून ओलांडल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांना फ्लॅग मीटिंगद्वारे पाकिस्तानच्या ताब्यात दिले जाते. यापूर्वी जून २०२६ मध्ये कुपवाड्यातील असद खान आणि फेब्रुवारीमध्ये सांबा जिल्ह्यातील एका पाकिस्तानी नागरिकाला अनवधानाने सीमा ओलांडल्यामुळे पकडण्यात आले होते. दोघांनाही चौकशीनंतर पाकिस्तानला परत पाठवण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version