घरक्राईमनामासरकारी पोर्टल हॅक करून अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी

सरकारी पोर्टल हॅक करून अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी

१४ वर्षीय मुलाला घेतले ताब्यात

अग्निवीरांशी संबंधित माहिती डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने याप्रकरणी हरियाणातील बल्लभगढ येथील १४ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (MHA) अग्निवीर भरती पोर्टलमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून २,५०० हून अधिक अग्निवीरांची माहिती मिळवल्याचा संशय आहे. हा डेटा डार्क वेबवर ५०० डॉलरला विकण्याची जाहिरात त्याने दिली होती. मात्र, त्याने दिलेला डेटा खरा आहे का आणि सरकारी पोर्टल प्रत्यक्षात हॅक झाले होते का, याची पडताळणी अद्याप सुरू आहे.

दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटला सप्टेंबरमध्ये डार्क वेबवर ही जाहिरात आढळली. त्यामध्ये संबंधित किशोराने सुमारे २,५०० ते ४,००० अग्निवीरांची माहिती असल्याचा दावा केला होता. तसेच संबंधित वेबसाइटच्या ऍडमिन पॅनेलचा प्रवेश मिळवून देण्याची ऑफरही दिली होती. जाहिरातीत दिलेल्या टेलिग्राम आयडीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि ऑक्टोबरमध्ये त्याला ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

कॅलिफोर्नियात ३६ मालगाड्यांची लूट करत २०० कोटींचा माल लंपास

हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ

परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?

पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या तरुणाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साधनांचा वापर करून वेबसाइटमधील कोडिंगमधील त्रुटी शोधल्या आणि त्याद्वारे प्रवेश मिळवल्याचा संशय आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदवलेल्या अर्जदारांचे खाते आणि पासवर्ड यांसारखी माहिती मिळवल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्या डिजिटल उपकरणांची तपासणी केली असता काही डेटा आढळून आला. मात्र, त्याने प्रत्यक्षात कोणालाही हा डेटा विकल्याचे अद्याप समोर आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version