घरक्राईमनामापश्चिम बंगालमध्ये बलात्काराची पुन्हा घटना, संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड !

पश्चिम बंगालमध्ये बलात्काराची पुन्हा घटना, संतप्त जमावाकडून आरोपीच्या घराची तोडफोड !

आरोपीला अटक

प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्या घटनेवरून देशात संतप्त वातावरण आहे. आरोपीच्या शिक्षेसाठी आणि सरकारच्या विरोधात पश्चिम बंगालसह देशात ठिकठिकाणी निदर्शने होते आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुन्हा अशीच एक घटन घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संतप्त जमावाने आरोपीच्या घरात घुसून तोडफोड केली आहे.

पश्चिम बंगालमधील मध्यमग्राममध्ये बाल अत्याचाराची घटना घडली आहे. या प्रकरणी स्थानिक लोकांनी रविवारी (०१ सप्टेंबर) आरोपीच्या घराची तोडफोड केली. या तोडफोडीच्या व्हिडीओ देखील समोर आला आहे. संतप्त जमावाने आरोपीच्या घरात घुसून गोंधळ घातला आणि सामानाची तोडफोड केली.

हे ही वाचा :

बांगलादेशात दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीचे विटंबन

निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी

टीएमसी प्रवक्त्यांना वृत्तवाहिनांवर जाण्यास मज्जाव

पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक

बारासातचे एसडीपीओ अजिंक्य अनंत म्हणाले की, ‘मध्यमग्राममध्ये बाल शोषणाची घटना घडली आहे, मध्यमग्राम पोलिसांनी ३ तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नाही.  नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version