24 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरधर्म संस्कृतीश्री तुळजाभवानीदेवीच्या जमीन महाघोटाळ्याच्या चौकशीचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

श्री तुळजाभवानीदेवीच्या जमीन महाघोटाळ्याच्या चौकशीचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश

लाखो हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या ४ हजार १२१ एकरपेक्षा अधिक इनामी जमिनीच्या अनधिकृतपणे हस्तांतरण आणि विक्री प्रकरणाची आता राज्य शासनामार्फत चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनाची गंभीर दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशीवच्या जिल्हाधिकार्‍यांना या संदर्भात तातडीने चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवीला १ सहस्र ६६६.१४ हेक्टर म्हणजेच सुमारे ४ हजार १२१.१४ एकर जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री होऊ शकत नाही आणि याला ‘कुळ कायदा’ देखील लागू होत नाही. असे असतानाही महसूल अधिकारी आणि अन्य व्यक्तींच्या संगनमताने हजारो एकर जमीन लाटण्यात आल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री ३ हजार ३९७ एकर भूमी असतांना प्रत्यक्ष ताबा मात्र चार मठांमधील खाजगी व्यक्तीकडे आहे, तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून थेट खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून ६३.०३ एकर जमिनीपैकी काही जमीन ‘संरक्षित कुळ’ दाखवून अनधिकृतपणे विकण्यात आली, तर एका अव्वल कारकुनाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावे ७/१२ वर नोंदवली. याशिवाय अपसिंगा आणि उफळा या गावांमधील १५८ एकर जमीन अनधिकृतपणे फेरफार नोंदी करून लाटण्यात आली आहे.
संबंधितांवर तातडीने गुन्हे नोंद व्हावेत
या प्रकरणात बेकायदेशीर हस्तांतरणात सामील असलेले तत्कालीन उपजिल्हाधिकारी, विश्‍वस्त आणि संबंधित मोठ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल व्हावेत, अशी महासंघाची मागणी आहे. शासनाने विशेष अधिकारांचा वापर करून सर्व अनधिकृत खरेदीखते आणि ७/१२ वरील नोंदी तत्काळ रद्द कराव्यात आणि पूर्ण १ हजार ६६६.१४ हेक्टर जमीन पुन्हा श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रत्यक्ष नियंत्रणात घ्यावी, अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा

Exit mobile version