घरधर्म संस्कृतीमेघालयातल्या त्या झोपडीची झाली शाळा; ख्रिस्तीकरणाला चाप

मेघालयातल्या त्या झोपडीची झाली शाळा; ख्रिस्तीकरणाला चाप

सुनिल देवधरांनी केले उदघाटन

मेघालयातल्या मॉकरनॉट या गावात ख्रिस्तीकरणापुढे न झुकता आपली हिंदू ओळख कायम राखणाऱ्या कुटूंबातील मुलांना हवी होती एक शाळा. ऍडव्होकेट डेलिना खाँगडुम यांनी अशी एक शाळा उभी केली. हिंदुत्ववादी विचाराच्या गावकऱ्याने आपली झोपडी त्या शाळेसाठी दिली आणि एक शानदार शाळा तिथे उभी राहिली. या शाळेचे उदघाटन तिथे संघप्रचारक म्हणून काम केलेले भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या हस्ते झाले.

त्यासंदर्भात बोलताना सुनील देवधर म्हणाले की, मॉकरनॉट या गावापासून काही अंतरावर म्हणजे काही किलोमीटर अंतरावर फ्लांग तंगूर नावाचे एक गाव आहे जिथे एक विद्यालय मी जेव्हा प्रचारक होतो तेव्हा सुरू केले होते. त्या विद्यालयात मेघालयमधील ही मुले शिकत होती. ही तीच मुले आणि त्यांचे कुटुंबीय आहेत जे ख्रिश्चनीकरणापुढे झुकले नाहीत. त्यांनी आपला हिंदू धर्माचे पालन केले. कोविडच्या काळात मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला. मुलांना त्या शाळेत शिकण्यासाठी जाणे शक्य होत नव्हते.

हे ही वाचा:

‘बिन शर्ट’ आंदोलनाप्रकरणी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक

खेलो इंडिया विंटर गेम्स २०२६ ला गुलमर्गमध्ये शानदार सुरुवात

अभिषेक, तिलक की रिंकू? पुढच्या सामन्यात संजू सॅमसनला संधी?

ड्रॅगनच्या जाळ्यातून महाराष्ट्र देशाला मुक्त करणार

ऍडव्होकेट डेलिना खाँगडुम या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत. यांनी विचार केला की, ही मुले तिथे शिकू शकत नाहीत, त्यांचे नुकसान होत आहे, मात्र या गावातील बाएक्त खाँग्वेट आहेत ज्यांनी आपली झोपडी या शाळेसाठी मुलांना देण्याचा निर्णय घेतला. या झोप़डीत डेलिनाने मुलांना शिकविण्यास सुरुवात केली. जी मुले फ्लांग तंगूरला शाळेत शिकण्यास जाऊ शकत नव्हती त्यांच्यासाठी ही शाळा सुरू केली. त्यासाठी डेलिना यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य बनल्यावर आपल्या वेतनातून त्यांनी इथे नवी शाळा उभारण्यास सुरुवात केली. आज शाळा उभी राहिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version