घरधर्म संस्कृतीमालेगाव महानगरपालिकेच्या कमानीवर उर्दू नाव कशाला?

मालेगाव महानगरपालिकेच्या कमानीवर उर्दू नाव कशाला?

हिंदू नेत्या हर्षा ठाकूर यांचा सवाल

मालेगाव महानगरपालिकेत बहुसंख्य मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. या महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या कमानीवर उर्दूमध्ये नाव लिहिण्यात आले आहे. त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. हा व्हीडिओ आताचा आहे की जुना हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

हिंदू समाजाच्या मेळाव्यात या उर्दू नावावर आक्षेप घेण्यात आला. हर्षा ठाकूर यांनी या मेळाव्यात भाषण करताना या कमानीवर उर्दूत नाव का लिहिले असा सवाल उपस्थित केला. आणखी कोणत्याही महानगरपालिकेवर उर्दूत नाव लिहिलेले नसताना इथे का म्हणून उर्दूत महानगरपालिकेचे नाव लिहिले आहे, असा सवाल हर्षा ठाकूर यांनी उपस्थित केला.

मालेगाव महानगरपालिकेच्या क्षेत्रात आज मुस्लिमांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इथे नाव उर्दूत लिहिले का, असाही सवाल लोक उपस्थित करत आहेत. हर्षा ठाकूर यांचे हे भाषण एका व्हीडिओच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी हा सवाल उपस्थित केल्यावर लोकांनी त्यावर टाळ्या वाजवून या मुद्द्याचे स्वागत केल्याचे दिसते.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version