केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिकार टप्प्यात येईपर्यंत शांत होते. अगदी योग्य वेळी त्यांनी बंदुकीचा चाप ओढला. आपण फुगून बैलाएवढे झालेलो आहोत, असा समज झालेल्या बेडकांना त्यांनी जागा दाखवली. ‘१४ पक्ष एकत्र येऊन दिल्लीत ८ हजार लोक जमा करता आणि सरकार खाली खेचण्याची भाषा करता?’ या शब्दांत त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लाज काढली. हा झाला पहिला दणका. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली. महानगरपालिकेचे कर्मचारी भटक्या कुत्र्यांना पकडून जसे गाडीत कोंबतात, अगदी तशीच! दोघांची रवानगी पाच दिवसांसाठी तिहार तुरुंगात करण्यात आली. अराजक माजवून देशाच्या जनतेला उपद्रव करणाऱ्यांवर बडगा उगारण्याची सुरूवात झालेली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या दणदणीत विजयाबद्दल पत्रकारांशी संवाद साधताना जोरदार फटकेबाजी केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांनी त्यांची औकात दाखवून दिली. सणावाराच्या काळात रस्त्यावर उतरून जनजीवन विस्कळीत करण्याचा उपक्रम काही उपद्रवी गेल्या काही दिवसांत राबवत आहेत. आम्ही वाट्टेल ते करू आणि सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत बसेल असा त्यांचा समज होता. जंतर मंतरवर करण्यात आलेले पहिले आंदोलन याला कारणीभूत होते. हे आंदोलन हाताळताना सरकारने दाखवलेल्या अनावश्यक सौम्यतेमुळे हे शेफारले होते. सरकार आपल्याला घाबरलेले आहे, असे त्यांना वाटत होते. ही मंडळी दया दाखवण्याच्या लायकीची नाहीत हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे या सगळ्यांची उत्तरपूजा करायला सरकारने सुरूवात केली आहे.
विदेशी पैशावर पोसलेल्या या आंदोलनजीवींच्या डोक्यात हवा गेली आहे. ‘सर्वोच्च न्यायालय आम्हाला कोण सांगणार?’, ‘दिल्ली पोलिसांकडून आम्ही परवानगी मागितली नाही, आम्ही फक्त त्यांना सांगितले आहे की आम्ही येतो आहोत’, अशा प्रकारची भाषा कॉकरोच वापरत होते. मागे चार लोक नाहीत, पण हे आव असा आणत होते की, जनतेने जणू जुनी व्यवस्था मोडीत काढून नवी रचना बनवण्याचा परवाना दिला आहे. सरकारने यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर देशात जनता उठाव करून रस्त्यावर येईल. हे लोकनियुक्त सरकारला आव्हान देत होते. भारतात नेपाळ, बांगलादेशची पुनरावृत्ती करण्याची भाषा बोलत होते.
‘जंतर मंतर पार्ट-२’ पूर्वीच विमानात उचलण्यात आलेल्या अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करताना दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घेतला होता. वर्षभर कोणतेही उपद्रवी आंदोलन करणार नाही, असे लिहून घेतले होते. त्यानंतरही दास आणि रांका काल जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी गेले. तिथे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. लिखित आश्वासनाला हरताळ फासून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
दिपके जिथे जातो, तिथे शिव्या खातो
दोन वर्षांत सर्व हिंदू मुलींच्या धर्मांतराची धमकी देत नालासोपाऱ्यात ‘लव्ह जिहाद’
१५ हजार अदानी सिमेंट गोण्यांमधून साकारली माँ दुर्गा
साखरेची मागणी वाढली, दरातही वाढ
जेव्हा त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले, तिथे काळे कुत्रेही फिरकले नाही. अटक झाल्याच्या बातमीची कुठेही प्रतिक्रिया नाही. कोणीही रस्त्यावर आले नाही. जनतेने चॅनलवर बातमी पाहिली. चॅनल बदलला, पुढची बातमी पाहायला लागले. भटक्या कुत्र्याला पकडताना पाहल्यानंतर जेवढी प्रतिक्रिया येते, तेवढीही नाही. दुसऱ्या बाजूला अमित शहा यांनी राहुल गांधींना त्यांची लायकी दाखवली. १४ पक्ष एकत्र करून तुम्ही ८ हजारांची संख्या जमवलीत, असा टोला हाणला. तुमच्या पाठीशी जनता नाही, हा या विधानाचा भावार्थ. २०२९ मध्ये चौथ्यांदा हरायला तयार राहा, या शब्दांत राहुल गांधी यांना ललकारले. बरेच दिवस राहुल गांधी यांची सौ सुनारकी लोकांनी पाहिली. मोदी-अमित शहा मला घाबरतात. माझ्याशी नजरसुद्धा मिळवू शकत नाहीत. अशा बाता राहुल गांधी गेली अनेक दिवस करतायत. मोदी आणि शहा शक्यतो अशा बाजारगप्पांना प्रत्युत्तर देत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी अधिकच शेफारले. मोदींचे सरकार आता गडगडणारच आहे, या थाटात त्यांची विधाने येत होती. अमित शहांनी त्यांना एक लोहार की दाखवून दिली आहे.
आपण किती थिल्लर आहोत, याचे प्रात्यक्षिक त्यांनी कालच्या मोर्चाच्या दरम्यान दाखवले. ८३ वर्षांचे बुजुर्ग पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना बॅटमॅनचा मास्क घालायला लावला. बहुधा नंतर ते स्वतः सुपरमॅनचा मास्क घालणार होते. या माणसाचे चाळे, त्याची विधाने पाहून याच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का, असा प्रश्न लोकांना पडावा. ही राहुल गांधी यांची लायकी. ‘फॅब्रिकेटेड मीडिया इव्हेंट करून तुम्हाला सत्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावे लागेल. देशात अशी अनेक गावे आहेत, जिथे काँग्रेसचे अस्तित्वच नाही. तुम्ही ईव्हीएमवर खापर फोडता, सिलचर त्रिपुरामध्ये तुमचा बॅलेटवरही पराभव झाला आहे.’ अशा जळजळीत शब्दांत अमित शहा यांनी राहुल गांधी यांची हजामत केली आहे.
राहुल गांधी यांच्या बिनडोक तर्कटाच्या विरोधात भाजपा नेते बोलले नाहीत, किंवा त्यांनी राहुल गांधी यांना उत्तरे दिली नाहीत, असे नाही. संबित पात्रा, सुधांशु त्रिवेदी, अनुराग ठाकूर अशा दिग्गजांच्या पत्रकार परिषदा झाल्या; परंतु अमित शहा हे अमित शहा आहेत. किमान शब्दांत कमाल लाज काढण्याचे तंत्र जेवढे यांना साधले आहे, तेवढे कुणालाच नाही. त्यांच्या शब्दांत जो जाळ आहे, त्याची इतरांशी तुलना होऊ शकत नाही.
राहुल गांधी यांनी एक रणनीती स्वीकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य निवडणूक आयुक्त, सरन्यायाधीश यांच्याबाबत जमेल तेवढे खोटे बोला, कमरेखालचे बोला, शिव्या घाला, शेलक्या शब्दांचा वापर करा. सगळ्या काँग्रेस नेत्यांचे वर्तन पाहिले तर हेच तंत्र तुम्हाला दिसेल. अशी भाषा वापरली की दोन प्रतिक्रिया येतात; एक तर समोरचा तशीच भाषा वापरून तुमच्या पातळीवर येतो, किंवा बिथरतो आणि काही चुका करतो. भाजपाच्या नेत्यांनी दोन्हीपैकी काही केले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने माती खाल्ल्यानंतर त्यांनी योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करत राहुल गांधी यांचे कपडे उतरवले.
मोदी सरकारच्या विरोधात कॉकरोच आणि राहुल गांधी वेगवेगळे लढत असले तरी त्यांची रणनीती एकच आहे. आपण काहीही केले तरी आपल्यावर कारवाई होणार नाही, आपण काहीही बोललो तरी कोणी विचारणार नाही, याबाबत त्यांना अतिआत्मविश्वास होता; कारण त्यांना परदेशात बसलेल्या त्यांच्या अनौरस बापांवर प्रचंड विश्वास आहे. जंतर मंतरवर झालेल्या दुसऱ्या कॉकरोच मोर्चाच्या बातम्या जगभरातील वर्तमानपत्रांत आल्या होत्या. मोदी सरकारने केलेल्या कारवाईचे वर्णन ‘क्रॅक डाऊन’ असे करत, त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. या बातम्या छापून येणार, मग सोशल मीडियावर ग्रेटा थनबर्गसारख्या धंदेवाईक एनजीओवाल्या आघाडी उघडणार, संयुक्त राष्ट्रसंघातून कोणीतरी आवाज उठवणार, अमेरिकेसह काही देशांतील नेते भारतातील मानवाधिकारांबाबत बोलणार, सरकारवर दबाव आणणार, याबाबत या सगळ्या आंदोलकांना इतका विश्वास होता. तो काही प्रमाणात खराही होता. जंतर मंतरवरील मोर्चावर कारवाई झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाने आवाज उठवला. परंतु सत्ता राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे काही कोणीही दम भरल्यानंतर गळपटणारे लेचेपेचे नाहीत. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचीच खरडपट्टी काढली. जशास तसे ही सरकारची रणनीती असून हे करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही.
उपद्रवी आंदोलकांच्या मागे परदेशातील भारतविरोधी आहेत, परंतु जनतेचे सरकारला समर्थन आहे. जनता सरकारवर खूश आहे. कॉकरोच आंदोलनावर केलेल्या कारवाईनंतर, सौरव दास आणि रांकावर कारवाई केल्यानंतर जनता सरकारवर जास्तच खूश झाली आहे. विदेशी पैशावर आंदोलने करून चैनीत जगणाऱ्यांना सरकारने व्यवस्थित चेचून काढावे हीच जनभावना आहे. ते होत नव्हते, म्हणून जनता नाराज होती. या कारवाईचा वेग जसा वाढेल, तसे सरकारला असलेले समर्थनसुद्धा वाढेल. विदेशी पैशावर पोसलेल्या या लोकांचे कारनामे जनतेसमोर आणून सरकारने यांना नागडे करावे आणि देशाच्या विरोधात षडयंत्र राबवल्याचा ठपका ठेवत, यांना कायमचे तिहारमध्ये पाठवावे, ही जनतेची मानसिकता आहे. सरकार त्या दिशेने वळताना दिसते आहे, ही समाधानाची बाब आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
