घरदेश दुनियापाकिस्तानात भूकंप आला आणि खचलेली भिंत ओलांडून कैदी फरार!

पाकिस्तानात भूकंप आला आणि खचलेली भिंत ओलांडून कैदी फरार!

पोलिसांकडून कैद्यांचा शोध सुरु

सोमवारी (२ जून) रात्री उशिरा पाकिस्तानच्या कराची शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘बच्चा जेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालीर जिल्हा कारागृहातील २१६ कैद्यांनी कारागृहातून पळ काढला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढत असताना ही घटना घडली. यावेळी काही कैद्यांनी रक्षकांवर हल्ला केला, त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली आणि तुरुंगाची भिंत तोडून पळून गेले. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४८ तासांत कराचीमध्ये ९ ते ११ वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

सिंध प्रांताचे पोलिस महानिरीक्षक गुलाम नबी मेमन म्हणाले, या भूकंपाच्या धक्क्यामुळे तुरुंगाची बाह्य भिंत कमकुवत झाली होती. याचा फायदा घेत कैद्यांनी भिंत तोडली आणि पळ काढला. ते पुढे म्हणाले, भूकंपानंतर मोजणीसाठी सुमारे २००० कैद्यांना बाहेर काढण्यात आले. या काळात २१३ कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यापैकी ७८ जणांना परत ताब्यात घेण्यात आले आहे, तर १३८ अजूनही फरार आहेत. यावेळी गोळीबारात एका कैद्याचा मृत्यू झाला आणि फ्रंटियर कॉर्प्सचे तीन कर्मचारी आणि तुरुंगातील एक कर्मचारी जखमी झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कैदी रस्त्यावर धावताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये दोन कैदी असे म्हणत आहेत की ते अनेक वर्षे तुरुंगात होते आणि आता ते मोकळे आहेत. पोलिस, रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सने परिसराला घेराव घातला आहे आणि पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.
हे ही वाचा : 
सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया-उल-हसन लंजर यांनी परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. तुरुंगातील बहुतेक कैदी ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचे होते, ज्यापैकी बरेच जण मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाकिस्तानमधील तुरुंगाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कराची शहर तीन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर असल्याने, भूकंपाच्या घटना सामान्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि तुरुंगाच्या संरचनात्मक असुरक्षिततेचे मूल्यांकन केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version