अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार मुसंडी मारत रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का दिला आहे. या निकालांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी निवडणुकीच्या रिंगणात असतो, तर रिपब्लिकन पक्षाचा दणदणीत विजय झाला असता,” असा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, निवडणुकीचे निकाल आपण पूर्णपणे स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले, “मी निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो. मी असतो, तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो.” दरम्यान, ‘न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षासोबत काम करण्याची तयारी दर्शवली. निवडणुकीचे निकाल आपण निश्चितपणे स्वीकारू, असे त्यांनी सांगितले. ‘आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. काहीतरी मार्ग निघेल,’ असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!
मध्यावधी निवडणुकात ट्रम्प यांनी गमावले अनेक बालेकिल्ले
ऍड. गौरी भिडेंकडून वडिलांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन
प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’ची २५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री
या निवडणुकीत ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेल्या अनेक रिपब्लिकन उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. सिनेटच्या निवडणुकीत नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि ओहायो येथे डेमोक्रॅटिक उमेदवारांनी विजय मिळवला. ओहायोमध्ये शेरॉड ब्राउन यांनी रिपब्लिकन उमेदवार जॉन हस्टेड यांचा, तर टेक्सासमध्ये जेम्स टॅलारिको यांनी केन पॅक्स्टन यांचा पराभव केला. नॉर्थ कॅरोलिनामध्ये माजी गव्हर्नर रॉय कूपर यांनीही विजय मिळवला. प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीतही डेमोक्रॅट्सने महत्त्वाच्या जागा जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवरील रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण गमावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निकालांमुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील उर्वरित दोन वर्षांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
