घरदेश दुनियापोस्ट केली, नंतर एडिट केली! अमेरिका-इराण कराराबाबत घोषणेची पाकिस्तानची घाई

पोस्ट केली, नंतर एडिट केली! अमेरिका-इराण कराराबाबत घोषणेची पाकिस्तानची घाई

शरीफ यांनी केलेल्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती समोर आल्याचे उघड

अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. कराराबाबतची महत्त्वाची माहिती देताना शरीफ यांनी केलेल्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती असल्याचे समोर आल्यानंतर ती पोस्ट संपादित करून संबंधित मजकूर हटवण्यात आला.

फ्रान्समधील व्हर्साय येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी डिजिटल पद्धतीने करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली असून जगभरातून त्याचे स्वागत करण्यात आले.

कराराची माहिती समोर येताच शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर एक विस्तृत पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिका आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्याचे नमूद करत, १९ जून रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे औपचारिक स्वाक्षरी समारंभ होणार असल्याचा उल्लेख केला होता. मात्र काही वेळानंतर ही पोस्ट संपादित करण्यात आली आणि जिनिव्हातील स्वाक्षरी समारंभाचा उल्लेख हटवण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानकडून चुकीची माहिती प्रसारित झाल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी स्पष्ट केले की, करारावर आधीच डिजिटल पद्धतीने स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे जिनिव्हा येथे कोणताही औपचारिक प्रत्यक्ष स्वाक्षरी समारंभ होणार नाही. मात्र अमेरिका आणि इराणची वाटाघाटी करणारी पथके पुढील चर्चेसाठी शुक्रवारी जिनिव्हामध्ये भेटणार आहेत.

अमेरिका-इराण शांतता प्रक्रियेत पाकिस्तानने सक्रिय भूमिका बजावल्याचा दावा केला जात आहे. या प्रक्रियेत कतार, इजिप्त आणि तुर्की यांचाही सहभाग होता. इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चांमधून दोन्ही देशांना जवळ आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. तथापि, त्यातून तत्काळ तोडगा निघाला नव्हता.

१४ जूनपूर्वीच अमेरिका आणि इराण कराराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळू लागले होते. १४ जून रोजी शहबाज शरीफ यांनी शांतता कराराबाबतची माहिती सार्वजनिक केली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या कराराची घोषणा केली.

हे ही वाचा:

ठाकरे गटात भूकंप होणारच! बैठकीला ६ खासदार गैरहजर

तृणमूलचे बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जींचे विरोधी पक्षनेतेपद कायम!

वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीच्या जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात मौलवी अटकेत

वसई-विरारमध्ये खड्डे बुजवण्यासाठी ४४.९२ कोटींचा अतिरिक्त खर्च

विशेष म्हणजे, जिनिव्हामध्ये प्रत्यक्ष स्वाक्षरी समारंभ होणार असल्याची माहिती केवळ सोशल मीडिया पोस्टमधूनच नव्हे, तर पाकिस्तानच्या संसदेतही शहबाज शरीफ यांनी दिली होती. त्यामुळे नंतर ती माहिती मागे घ्यावी लागल्याने पाकिस्तान सरकारची काहीशी कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमेरिका-इराण करारामुळे पश्चिम आशियातील संघर्ष कमी होण्याची आशा व्यक्त केली जात असताना, या घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवर आणि शहबाज शरीफ यांच्या घाईघाईत केलेल्या घोषणांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version