घरदेश दुनियाबांगलादेशात परतण्यासाठी शेख हसीनांचा नव्या पासपोर्ट, ओळखपत्रासाठी अर्ज

बांगलादेशात परतण्यासाठी शेख हसीनांचा नव्या पासपोर्ट, ओळखपत्रासाठी अर्ज

डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याची तयारी

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतात आश्रय घेतलेल्या हसीना यांनी नव्या पासपोर्टसह राष्ट्रीय ओळखपत्र (NID) मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची इच्छा त्यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. आता नव्या प्रवास कागदपत्रांसाठी केलेल्या अर्जामुळे त्यांच्या मायदेशी परतण्याच्या हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.

हसीना यांच्या लंडनस्थित मॅट्रिक्स चेंबर्स या कायदेविषयक संस्थेच्या वकिलांनी सोमवारी (९ नोव्हेंबर) दिल्लीतील बांगलादेश दूतावासाच्या प्रभारी उच्चायुक्त प्रीती रहमान यांना पत्र पाठवले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हसीना यांचा जुना पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्र रद्द केल्याचे सांगत, त्यांना नवीन कागदपत्रे जारी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. तसेच ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची विनंतीही वकिलांनी केली आहे. बांगलादेशच्या नागरिक म्हणून त्यांना ही कागदपत्रे मिळण्याचा अधिकार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतून न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर परतीची तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे ही वाचा:

दिवाळीच्या रात्री आतषबाजी, दुसऱ्या दिवशी मुंबईत प्रदूषणाची कोंडी

फटाक्यांचा रेल्वे सिग्नल यंत्रणेला फटका; पश्चिम रेल्वे उशिराने

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई

एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर?

दरम्यान, हसीना यांच्यासमोर गंभीर कायदेशीर आव्हाने आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील कारवाईचे आदेश दिल्याच्या आरोपाखाली नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मात्र, हसीना यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version