आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. नालासोपारा आणि विरार स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. परिणामी, लोकल १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
हे ही वाचा:
दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण’ची ५६.१५ कोटींची कमाई
एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग चिनी गुप्तचर यंत्रणेच्या निशाण्यावर?
कुख्यात गँगस्टर गुरविंदर इथिओपियातून भारतात प्रत्यार्पित
इस्रायलमध्ये गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण
माहितीनुसार, रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील वायरिंग जळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. सोमवारी सकाळी अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे अनेक प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. काही प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग स्वीकारला.
