घरदेश दुनियास्टारलिंकला परवानगी नाही, मस्क यांची अंबानींवर आगपाखड

स्टारलिंकला परवानगी नाही, मस्क यांची अंबानींवर आगपाखड

सोशल मीडियावर एलॉन मस्क यांची पोस्ट

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावरून उद्योगपती एलोन मस्क आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यातील वाद वाढला आहे. स्टारलिंकला अद्याप भारतात सेवा देण्याची परवानगी न मिळाल्यामुळे एलोन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आगपाखड केली आहे. त्यांनी अंबानी यांना उपरोधिकपणे ‘पंतप्रधान अंबानी’ संबोधत, भारतात स्टारलिंकला स्पर्धा करण्याची संधी देण्याची मागणी केली. भारतातील दूरसंचार क्षेत्रावर अंबानी यांचा प्रभाव असल्याचा सूचक आरोपही त्यांनी केला.

मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “प्रिय पंतप्रधान अंबानी, तुम्हीच भारताचे खरे बॉस आहात, हे लक्षात न आल्याबद्दल माझी नम्र माफी स्वीकारा.” पुढे त्यांनी अंबानी यांच्यावर ‘मक्तेदारीच्या माध्यमातून भारतीयांचे शोषण’ सुरू ठेवण्याची इच्छा असल्याचा आरोप करत, स्टारलिंकला स्पर्धा करू देणार का, असा सवाल केला.

भारतातील अनेक भागांमध्ये अद्याप इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा मस्क यांनी उपस्थित केला. अशा भागांमध्ये इंटरनेट पोहोचल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी मिळू शकतात, तसेच लहान व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचणे शक्य होईल, असा दावा त्यांनी केला. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पारंपरिक दळणवळण व्यवस्था ठप्प झाल्यास स्टारलिंकसारखी सॅटेलाइट इंटरनेट सेवा महत्त्वाची ठरू शकते, असेही मस्क यांनी म्हटले.

केंद्र सरकारने सुनावले

मस्क यांच्या आरोपांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने भारतातील सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठीची नियामक व्यवस्था निष्पक्ष आणि भेदभाव न करणारी असल्याचे सांगितले. या सेवा सुरू करण्यासाठी संबंधित कंपन्यांना सुरक्षा अटींचे पालन करणे आवश्यक असून, तीनही परवानाधारक कंपन्यांच्या सुरक्षा तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यामुळे स्टारलिंकला जाणीवपूर्वक रोखले जात असल्याचा दावा सरकारने फेटाळला.

हे ही वाचा:

नावी पिल्लई यांना नोबेल मिळाल्यावर ट्रम्प यांची आदळआपट

आंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले

भारतावर शुल्क लादणारे ट्रम्प आता डिझेलसाठी पुतीन यांच्या दारी

अमेरिकेच्या ग्रीन कार्ड निर्णयावर भारताचा स्पष्ट इशारा

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या शर्यतीत मस्क यांच्या स्पेसएक्सची स्टारलिंक, भारती समूहाशी संबंधित युटेलसॅट वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स या कंपन्या आहेत. संबंधित परवानग्या मिळाल्यानंतरही सुरक्षा तपासणी आणि स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय या कंपन्यांना सेवा सुरू करता येणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version