घरक्राईमनामाएसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!

एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!

- Advertisement -

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संप सुरू होता. या संपादरम्यान १०० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रखडलेल्या वेतनामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा याची चिंता होती. त्यामुळेही अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती. यावर आता भाजपा नेते अभिजित सामंत यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

अभिजित सामंत यांनी ट्विट केले आहे की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभ दिवशी मी माननीय मुंबई उच्च न्यायालयाला विनंती करतो की, १०० हून अधिक एसटी कामगारांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या प्रकरणांबाबत सुओ मोटो खटला भरावा आणि राज्य सरकारला त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात यावे. हीच खरी डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा:

देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर

रणबीर आलियाचा ‘सावरीया’

एलन मस्क ट्विटर खरेदी करणार?

फडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल

एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यापूर्वी काही महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे या विवंचनेत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर काहींनी मुलांच्या शाळांची फी भरता येत नाही म्हणून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. संप सुरू झाल्यावरही महाविकास आघाडी सरकारने मागण्या मान्य न केल्यामुळेही संपादरम्यान काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अद्यापही सरकारने या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात काहीही निर्णय घेतलेला नाही किंवा मदतही जाहीर केली नाही. त्यामुळे अभिजित सामंत यांनी ही मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version