हलाल मांस विकण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरून लंडनमधील भारतीय मालकीच्या रेस्टॉरंटचे मालक हरमन सिंग कपूर यांना धमकावण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॅमरस्मिथ परिसरातील ‘सिंग्स डायनिंग’ या रेस्टॉरंटबाहेर ‘प्राउडली नॉन-हलाल’ असा फलक लावण्यात आला आहे. याच भूमिकेवरून कपूर यांना लक्ष्य करण्यात येत असून, त्यांचे रेस्टॉरंट जाळून टाकण्यासह जीवे मारण्याच्या आणि कुटुंबीयांवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कपूर यांच्यावर नॉन-हलाल मांस विकण्यासोबतच पॅलेस्टाइनविरोधी वक्तव्ये केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर आक्षेप घेत इस्लामी लोकांनी रेस्टॉरंटबाहेर निदर्शने केली. त्यामुळे हलाल आणि नॉन-हलाल मांस विक्रीचा मुद्दा तसेच त्यांच्या सोशल मीडिया भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी
नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा
राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा
५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा
कपूर यांच्या नॉन-हलाल भूमिकेवरून यापूर्वीही वाद झाला होता. त्यांचे पूर्वीचे ‘रंगरेझ’ हे रेस्टॉरंटही या वादाच्या केंद्रस्थानी होते. ऑनलाइन छळ, धमक्या आणि वारंवार होणाऱ्या निदर्शनांमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला होता. आता नव्या रेस्टॉरंटबाहेरही विरोध सुरू झाल्याने हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
🚨BREAKING: Islamists have gathered outside Singh’s Dining in London, an Indian-owned restaurant that does not serve halal meat.
A sign outside the premises reads “proudly non-halal” sign.
They are threatening to burn his shop down, r@pe his family members and kill him.
He is being accused of selling non halal meat in London and making anti-Palestinian statements. https://t.co/8jMBniqRG2
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 13, 2026
