घरक्राईमनामापाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये पाऱ्याचा ‘विषारी’ डोस!

पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये पाऱ्याचा ‘विषारी’ डोस!

नांदेडमध्ये जप्त केलेल्या क्रीममध्ये ४८ हजार पट अधिक पारा

गोरेपणा वाढवण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मानवी आरोग्यास घातक असलेल्या पाऱ्याचे (मर्क्युरी) धक्कादायक प्रमाण आढळले आहे. नांदेडमध्ये जुलै महिन्यात जप्त करण्यात आलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्यात दोन क्रीममध्ये पाऱ्याचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा हजारो पटींनी अधिक असल्याचे समोर आले आहे.

नांदेडमधील मण्यार गल्ली परिसरातील एका दुकानावर ९ जुलै रोजी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला होता. या कारवाईत सुमारे ३९ लाख ६९ हजार ९४० रुपये किमतीचा पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनांवर इंग्रजी आणि उर्दू भाषेत ‘मेड इन पाकिस्तान’ असे लेबल होते. त्यानंतर या उत्पादनांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, ‘पार्ले २४ के गोल्ड ग्लिम ब्युटी क्रीम’मध्ये पाऱ्याचे प्रमाण तब्बल ४८ हजार ४५३.४४ पीपीएम आढळले. सौंदर्यप्रसाधनांमधील पाऱ्याची निर्धारित कमाल मर्यादा १ पीपीएम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या क्रीममधील पाऱ्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा सुमारे ४८ हजार पट अधिक आहे. तसेच ‘गोरी ब्युटी क्रीम विथ लायकोपीन’मध्येही ६ हजार ९२४.९४ पीपीएम पारा आढळला.

हे ही वाचा:

राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे कायम

१९८४ दंगल पीडितांकडून सोनिया गांधींच्या पुस्तकाची होळी

पाऱ्यासारख्या जड धातूंचा त्वचेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश झाल्यास मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा क्रीमचा नियमित वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. या प्रकरणी दुकानचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा आणि विदेश व्यापार कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या उत्पादनांचा पुरवठा कुठून झाला आणि त्यांची विक्री आणखी कुठे केली जात होती, याचाही तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version