घरराजकारणअमोल कीर्तीकरांच्या प्रचारात 'कौन घुसा'...बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा!

अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात ‘कौन घुसा’…बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा!

भाजपकडून जोरदार टीका

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पडले.उर्वरित टप्प्याच्या मतदानासाठी राजकीय पक्षाकडून प्रचारसभा सुरु आहेत.दरम्यान, उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारावरून नवा वाद निर्माण झाला आहे.१९९३ च्या बॉम्बस्फोटचा (१९९३ Bomb Blast) आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा अमोल किर्तीकर यांच्या प्रचार सभेत फिरताना दिसला आहे.या प्रचार रॅलीचा व्हिडीओ भाजपच्या हाती लागला असून भाजपनं या व्हिडीओवरुन थेट उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे.या प्रचार रॅलीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत लिहिले की, उद्धव ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती.१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे.

हे ही वाचा:

युक्रेन आता कैद्यांना भरती करणार सैन्य दलात

“खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?”

उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद? अल्पवयीन मुलीला धावत्या रेल्वेखाली फेकले

‘केरळचे राज्यपाल आरिफ खान प्रभू राम चरणी नतमस्तक’

उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला.आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ९३ च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे.उद्धव ठाकरे तुमची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version