घरराजकारणनकारात्मक राजकारणाच्या जोरावर विरोधकांना ३० वर्षे सत्ता मिळणार नाही!

नकारात्मक राजकारणाच्या जोरावर विरोधकांना ३० वर्षे सत्ता मिळणार नाही!

अमित शाहांचा राहुल गांधींना टोला

“तुमच्या नकारात्मक राजकारणाच्या आधारावर तुम्ही ३० वर्षे सरकार स्थापन करू शकणार नाही,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. निवडणुकीतील पराभवानंतर मतचोरीचे आरोप करणे आणि रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याऐवजी जनतेच्या समस्या समजून घ्या, त्यांच्यासाठी काम करा आणि लोकांचा विश्वास संपादन करा, असा खोचक सल्ला अमित शाह यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला दिला. दिल्लीतील जल बोर्डाच्या ८,९४१ कोटी रुपयांच्या ३३ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करताना ते बोलत होते.

अमित शाह म्हणाले की, राजकीय डावपेच आणि गर्दीच्या जोरावर जनतेचा कौल नाकारता येत नाही. निवडणुका जिंकायच्या असतील, तर जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. ज्या राज्यांत सत्ता मिळाली आहे, तिथे लोककल्याणकारी योजना राबवाव्यात; अन्यथा उरलेल्या राज्यांतूनही पक्षांचा राजकीय प्रभाव संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला. अमित शाह म्हणाले की, “मला तुम्हाला सांगायचे आहे की, अमित शाह यांचा जन्म इथेच झाला, ते इथेच राहतात आणि इथेच मरतील. मला दर सहा महिन्यांनी परदेशात जाण्याची गरज नाही.” असा सणसणीत टोला अमित शाह यांनी राहुल गांधींना लगावला.

भाजप निवडणुका जिंकू लागल्यापासून काँग्रेस आणि आप मतचोरीचे आरोप करत असल्याचा दावा अमित शाह यांनी केला. घुसखोरांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठीच विरोधक मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्याऐवजी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असे ते म्हणाले. एसआयआर प्रक्रिया २०२४ नंतर सुरू झाली. मग त्याआधी अनेक वर्षे काँग्रेसला विविध राज्यांत पराभव का स्वीकारावा लागला, असा सवाल शाह यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि गुजरातमध्ये काँग्रेसला अनेक दशकांपासून मोठे यश मिळालेले नाही, असे सांगत त्यांनी पक्षाच्या निवडणूक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

केरळ, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणात विरोधक जिंकले, तेव्हाही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि निवडणूक आयोग हेच होते, याची आठवण त्यांनी करून दिली. “तुमचा पराभव झाला की निवडणूक आयोगावर टीका करता; न्यायालयाचा निर्णय अनुकूल आला तर ते योग्य, अन्यथा अयोग्य ठरवता,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

हे ही वाचा:

“भाजप सत्तेत असेपर्यंत भारतात पाऊल ठेवणार नाही”

रेहान वाड्राच्या प्रदर्शनातून आंदोलनांचे फोटो हटवले

सुटका होताच सौरव दास, आशुतोष रांकाला क्राईम ब्रँचने बोलावले

“परदेशी नेत्यांची वक्तव्ये मूर्खपणाची, अस्वीकार्य”

भाजप आणखी ३० वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास व्यक्त करत शाह यांनी काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे पक्षाला सत्तेत परतणे कठीण जाईल, असे म्हटले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए मोठ्या बहुमताने विजयी होईल, तर काँग्रेसला सलग चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागेल, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माध्यमांसमोर कार्यक्रम करून आणि आरोपांची पुनरावृत्ती करून जनतेचा विश्वास मिळणार नाही, तर प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करावे, असे शाह म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version