घरराजकारणहा नरेंद्र मोदींचा भारत आहे, वेचून वेचून हिशेब केला जाईल!

हा नरेंद्र मोदींचा भारत आहे, वेचून वेचून हिशेब केला जाईल!

गृहमंत्री अमित शहांनी दिला गंभीर इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला योग्य व अचूक प्रत्युत्तर देईल. कोणीही असा समजू नये की भ्याड हल्ला हा त्यांचा विजय आहे. हे लक्षात ठेवा, हा नरेंद्र मोदींचा भारत आहे आणि सूड घेतला जाईल, एकेकाचा वेचून वेचून हिशोब होईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतविरोधी शक्तींना इशारा दिला. हे २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांचे पहिले सार्वजनिक वक्तव्य होते. “

ते पुढे म्हणाले की, सरकारची दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची कटिबद्धता आहे. या देशाच्या प्रत्येक इंचातून दहशतवाद उखडून फेकण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो निश्चितच पूर्ण होईल.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, फक्त १४० कोटी भारतीयच नव्हे तर संपूर्ण जग भारताच्या या लढ्यात उभे आहे. जगातील सर्व देश एकत्र आले आहेत आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताच्या पाठीशी उभे आहेत.

अमित शहा म्हणाले, “मी पुन्हा सांगतो की, जोपर्यंत दहशतवाद नष्ट होत नाही, तोपर्यंत आमची लढाई चालू राहील आणि ज्यांनी हे दहशतवादी कृत्य केले आहे, त्यांना निश्चितच योग्य शिक्षा दिली जाईल.”

हे ही वाचा:

दोन पत्रकार परिषदा, दोन संकेत…

एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला!

फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

अमृतसर: पाकिस्तानी सीमेवर बीएसएफकडून ५ हँडग्रेनेड, ३ पिस्तूलांसह अनेक शस्त्रे जप्त!

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन माळावर झालेल्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि १ स्थानिक व्यक्ती ठार झाले होते. या हल्ल्यासाठी बंदुकधारकांनी आधीपासून नियोजन केले होते, जिथे पोहोचण्यासाठी पायी चढाई किंवा टट्टू सेवा आवश्यक होती. हल्ल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री श्रीनगरला गेले होते. तेथे त्यांनी २३ एप्रिल रोजी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांना सांत्वना दिली व मृतदेहांवर पुष्पचक्र अर्पण केले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध खालावले, आणि भारताने अनेक कडक पावले उचलली — त्यात सिंधू नदी पाणी करार (Indus Waters Treaty) थांबवणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे इत्यादी उपाययोजना करण्यात आल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version