घरविशेषबाबरी मशिदीच्या विटा उखडून फेकल्यात, आता तिथे भव्य राम मंदिर आहे!

बाबरी मशिदीच्या विटा उखडून फेकल्यात, आता तिथे भव्य राम मंदिर आहे!

मंत्री अनिल विज यांचा पाकिस्तानी खासदार पलवाशा खान यांच्यावर पलटवार

अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैन्य रचेल असे वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी खासदार पलवाशा खान यांना हरियाणाचे ऊर्जा आणि वाहतूक मंत्री अनिल विज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी खासदाराचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नसल्याचे मंत्री अनिल विज यांनी म्हटले आहे.

बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवाशा मोहम्मद झई खान संसदेत म्हटले की, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा पिंडीचा एक सैनिक बाबरी मशिदीच्या पायाची पहिली वीट रचेल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर तिथे पहिली अजान देतील.’ आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत.

खासदार पलवाशा इथेच थांबल्या नाही, त्यांनी भारताला धमकी देखील दिली. त्या म्हणाल्या, ‘जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीच्या लाल किल्ल्याचे मैदान रक्ताने माखले जाईल.’ जर कोणी पाकिस्तानकडे वाईट नजर टाकली तर त्याचे डोळे काढले जातील. भारतीय सैन्य विभागले गेले आहे. कोणताही भारतीय शीख सैनिक पाकिस्तानविरुद्ध लढणार नाही कारण त्यांच्यासाठी ही गुरु नानक यांची भूमी आहे.

हे ही वाचा : 

पाकिस्तानच्या आयएसआयच्या वाढत्या उपस्थितीमुळे बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट!

दोन पत्रकार परिषदा, दोन संकेत…

बीएसएफने दहशतवादी कटकारस्थान उधळलं

फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल

खासदार पलवाशा यांच्या विधानावर मंत्री अनिल वीज म्हणाले, त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण ते स्वप्नातही होवू शकत नाही. बाबरी मशिदीची एक अन एक विट उखडून फेकून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी आता भव्य राम मंदिर आहे. यांना अजूनही बाबरी मशिदीची आठवण येत आहे, असे मंत्री वीज म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version