30 C
Mumbai
Saturday, September 12, 2026
घरराजकारणभाजपाच्या संजय कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

भाजपाच्या संजय कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

निस्वार्थी काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळख

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी आता सगळे पक्ष प्रचाराला लागले आहेत. विविध ठिकाणी पक्षांचे नेते प्रचार करत आहेत. अनेक उमेदवारांनी आपापली पक्षकार्यालये स्थापन करून त्यामाध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्ते हे कोणतीही अपेक्षा न बाळगता काम करत राहिले आणि त्यांच्या या निस्वार्थ कामाची दखल घेत त्यांना उमेदवारी मिळाली. भाजपाचे संजय कांबळे हे असेच एक उमेदवार.
हे ही वाचा:
कोणतीही अपेक्षा न बाळगता पक्षासाठी काम करणारे हजारो, लाखो कार्यकर्त्यांपैकी एक संजय कांबळे. वॉर्ड क्रमांक ४५ मधून ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या संजय नामदेव कांबळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते पार पडले. त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अतुल भातखळकर यांनी केले आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा

Exit mobile version