घरराजकारणकाँग्रेसच्या मनात आजही बाबरबद्दल आस्था!

काँग्रेसच्या मनात आजही बाबरबद्दल आस्था!

बाबरी पडल्याने सोनियांना अश्रु अनावर झाल्यासंदर्भात सुधांशू त्रिवेदी यांचा टोला

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्राच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्याची घटना दूरचित्रवाणीवर पाहताना आपल्याला अश्रू अनावर झाले होते, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाबर तेव्हाही काँग्रेसच्या मनात होता आणि आजही आहे,’ असा आरोप भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांच्या बिलाँगिंग – अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी त्यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेची आठवण सांगितली. ही मशीद पाडली जात असल्याचे पाहून आपण रडल्याचे त्यांनी म्हटले. या घटनेमुळे भारताचे धर्मनिरपेक्ष स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी देशाला दीर्घ संघर्ष करावा लागणार असल्याची जाणीव झाल्याचेही सोनिया गांधी यांनी सांगितले.

यावर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी टीका केली. ते म्हणाले की,  त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची खरी निष्ठा उघड झाली असल्याचा आरोप त्यांनी केला.  यावरून हे स्पष्ट होते की, बाबर तेव्हाही काँग्रेस पक्षाच्या मनात होता आणि आजही आहे.”

काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या ‘रामराज्य’ या संकल्पनेपासून दूर जात आता आपली विचारधारा ‘बाबर राज’पर्यंत मर्यादित केल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला. काँग्रेस हा ‘दोन चेहरे’ असलेला पक्ष असून, तो मुस्लिम समाजातील कट्टरपंथी घटकांशी जवळीक साधत असल्याचा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा:

…ही नक्षलवादावरील संपूर्ण विजयानंतरची पहिली दिवाळी

परदेशातही दीपोत्सवाचा थाट!

काँग्रेसला रिजिम चेंज हवाय….हा घ्या पुरावा !

…म्हणून सोनिया राहुलना यशस्वी मानत नाहीत!

सोनिया गांधी यांनी बाबरी मशीद पाडल्याची घटना दूरचित्रवाणीवर पाहिल्याच्या दाव्याच्या सत्यतेवरही भाजप नेत्याने प्रश्न उपस्थित केला. १९९२ मध्ये दूरदर्शनने या घटनेचे सातत्यपूर्ण थेट प्रक्षेपण केले नव्हते, असे सांगत सोनिया गांधी यांनी ही दृश्ये नेमकी कधी आणि कुठे पाहिली, असा सवाल त्यांनी केला. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसनेही त्यानंतरच्या काही दिवसांत मर्यादित व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित केली होती, असे त्रिवेदी यांनी नमूद केले.

याशिवाय गांधी कुटुंबातील तीन पिढ्यांनी बाबरच्या कबरीला दिलेल्या भेटींचाही त्यांनी उल्लेख केला. जवाहरलाल नेहरू यांनी १९५९ मध्ये, इंदिरा गांधी यांनी १९६८ मध्ये आणि राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत २००५ मध्ये बाबरच्या कबरीला भेट दिल्याचा संदर्भ देत, मुघल शासकाबद्दल काँग्रेसची जवळीक जुनी असल्याचा आरोप त्यांनी केला.

बाटला हाऊसनंतरही अश्रू ढाळले

सोनिया गांधी यांच्या बाबरी मशीद विध्वंसासंदर्भातील वक्तव्यावर टीका करताना भाजपने २००८ मधील बाटला हाऊस चकमकीशी संबंधित जुन्या राजकीय वादालाही पुन्हा उजाळा दिला. सुधांशू त्रिवेदी यांनी सोनिया गांधी यांच्यावर बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपींसाठी अश्रू ढाळल्याचा आरोप केला. काँग्रेसची खरी मानसिकता यातून दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version