घरराजकारणमहाविकास आघाडीने नेमलेले शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

महाविकास आघाडीने नेमलेले शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने नेमलेले हे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत. साई संस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप विश्वस्त मंडळावर घेण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या एका वर्षात या मंडळाला पायउतार व्हाव लागलं आहे.

दरम्यान, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी सुरु होती. अखेर आज औरंगाबाद न्यायालयाने शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

हे ही वाचा:

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी

शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येतात. १६ लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version