घरराजकारणदिपकेला घरी जाण्याची, फोनवर बोलण्याची पोलिसांनी दिली होती परवानगी

दिपकेला घरी जाण्याची, फोनवर बोलण्याची पोलिसांनी दिली होती परवानगी

आजीच्या अंत्यसंस्कारासाठी करणार होते प्रवासाची व्यवस्था, फोनची सुविधा

कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके याच्या आजीच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नसल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. अभिजित दिपकेची सुटका झाल्यानंतर त्याचे सहकारी सौरव दास, आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत दिपकेला अशा प्रसंगी त्याच्या कुटुंबियांशी बोलायलाही दिले नाही असा आरोप केला होता. दिपकेच्या कुटुंबीयांनीही वेळेत सुटका न केल्याचा आरोप केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी रविवारी हे आरोप फेटाळत व्हीडिओ प्रसारित करून वास्तव समोर आणले.

दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी आणि पोलीस उपायुक्त नेहा यादव यांनी सांगितले की, दिपकेला मदत करण्याची तयारी पोलिसांनी वारंवार दर्शवली होती. पोलिसांनी यासंदर्भातील एक व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी दिपकेला त्याच्या इच्छेनुसार घरी जाण्यासाठी बस, विमान किंवा अन्य वाहतुकीची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवताना दिसतो. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी दिपकेला सांगतात, “तुम्हाला कुठेही जायचे असेल, तर मी तुमच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करू शकतो. बस, विमान किंवा अन्य कोणत्याही मार्गाने जाण्याची व्यवस्था करता येईल.”

हे ही वाचा:

उदयवीर सिद्धूची सुवर्णकामगिरी

मणिपूरातील ताज्या हिंसाचारात ९ लोकांचा मृत्यू

नेपाळमध्ये पुन्हा पुराचे संकट

‘व्होट चोरी’चा पुरावा मागितल्याने महिला पत्रकारावर मिरची स्प्रे

तसेच, आपल्या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावरून दिपकेला त्याच्या कुटुंबीयांशी बोलण्याची व्यवस्था करून देण्याची तयारीही अधिकारी दर्शवतात. त्यावर दिपके म्हणतो, “नाही, हे शक्य नाही. मी माझ्या वडिलांशी बोलू शकत नाही.” यानंतर अधिकारी, “ठीक आहे, आपण काय करता येईल ते पाहू,” असे उत्तर देतात.

अभिजीत दिपकेच्या ८५ वर्षीय आजी सावित्रीबाई शंकरराव दिपके यांचे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिपकेचे काका विलास दिपके यांनी आरोप केला की, अंत्यसंस्कारासाठी अभिजितला सोडण्याची विनंती करण्यात आली पण त्याला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी दिपके यांना त्यांच्या आजीच्या निधनाची आणि अंत्यसंस्काराच्या वेळेची माहिती वेळेत देण्यात आल्याचे सांगितले. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करून देण्याची ऑफर देण्यात आली होती; मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही, असा पोलिसांचा दावा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version