घरराजकारणकोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा

अमित शाहांनी सांगितली अजित पवारांची आठवण

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी (उद्धव ठाकरे) संपर्क होत नव्हता; मात्र अशा कठीण काळात सकाळी सात वाजताही अजित पवार यांचा फोन यायचा, अशी आठवण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शाह यांनी हा प्रसंग सांगत त्यांच्या कामाचा झपाटा आणि तत्परतेचे कौतुक केले. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अमित शाह भावूक झाले, तर त्यांच्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही अश्रू अनावर झाले.

पुणे जिल्हा परिषद परिसरात शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, कोरोना काळात दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनची कमतरता होती, औषधे आणि गोळ्याही उपलब्ध होत नव्हत्या. केंद्रात गृहमंत्री म्हणून आपल्याकडे आपत्कालीन खात्याची जबाबदारी होती. अशा वेळी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नव्हता; मात्र अजितदादा सकाळी सात वाजता फोन करून परिस्थितीची माहिती देत आणि कामासाठी पाठपुरावा करत. एवढ्या सकाळी ते फोनवर उपलब्ध असणे आपल्यासाठी आश्चर्याची बाब होती, असे अमित शाह यांनी सांगितले.

अजित पवार हे केवळ मित्र नव्हे, तर सहकारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी पुढील तीन-चार दशके भरून निघणार नाही, असे अमित शाह म्हणाले. बारामतीच्या विकासात त्यांचे योगदान मोठे होते. जनता दरबारातून लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण बारामतीला वारंवार का जाता, असे विचारल्यावर तेथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जात असल्याचे अजित पवार सांगत, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

हे ही वाचा:

घरबसल्या नोकरीच्या आमिषाने तरुणीला ९०.८ लाखांचा गंडा

आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल

कुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

बिल्किस बानो प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील प्रवेशाबाबत बोलताना अमित शाह म्हणाले की, अजित पवारांना या निर्णयाचे कारण विचारले असता, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या विकासाला गती मिळाली असून त्या विकासप्रक्रियेशी जोडून घ्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेतही अजित पवार आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असत. पक्षातील कार्यकर्त्यांसाठी ते ठामपणे उभे राहत, असेही अमित शाह यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version