घरराजकारणदेवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात

देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात

भारतीय जनता पार्टीचे आक्रमक नेते गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा लावला आहे. शरद पावर हे ज्येष्ठ जरी असले तरीही श्रेष्ठ नाहीत असे पडळकर यांनी म्हटले आहे. तर देवेंद्र फडणवीस हे १०-२० पवार खिशात घेऊन फिरतात असा घाणघातही पडळकर यांनी केला आहे.

गुरुवार, १० मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा नोईवडणुकांचे निकाल लागले असून यापैकी ४ राज्यांमध्ये कमळ फुलले आहे. भारतीय जनता पार्टीने सत्ता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यात आपली सत्ता राखत जोरदार कमबॅक केला आहे. आज याच संदर्भात मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात जंगी उत्सव साजरा करण्यात आला. या विजयोत्सवात पडळकर हे देखील सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार, मग मुनव्वर राणा कुठे जाणार?

आज सादर होणार ठाकरे सरकारचा तिसरा अर्थसंकल्प

निवडणूक विजयानंतर पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये रोड शो

निष्पक्ष संस्थांना बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांची इको सिस्टीम

यावेळी माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. विश्वासघातकीपणा, गद्दारी, लबाडी, आणि राष्ट्राच्या विरोधात भूमिका या ज्या गोष्टी शरद पवारांकडे आहेत तसले विषय सोडून नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांकडे असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. तर शरद पवार यांना देवेंद्र फडणवीसांचे यश मान्य नसल्याचे ऐकून ते अधिकच आक्रमक झाले.

कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी पंपवारांची भूमिका आहे. काहीही केलं तरी मीच केलं असा त्यांचा दावा असतो. ते ज्येष्ठ असले तरीही श्रेष्ठ नाहीत असे पडळकर म्हणले. तर देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version