घरराजकारणपुन्हा एकदा होर्मुझला टाळे...इराणने केला दावा

पुन्हा एकदा होर्मुझला टाळे…इराणने केला दावा

इस्रायलने लेबेनॉनवर सुरू ठेवलेल्या हल्ल्यांमुळे घेतला निर्णय, अमेरिकेकडून मात्र इन्कार

इराणच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांड खातम अल अनबिया मुख्यालयाने धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या Strait of Hormuz या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आल्याचे इराणी वृत्तसंस्था मेहर न्यूज एजन्सीने म्हटले आहे.

लष्करी कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलने युद्धविराम कराराचा भंग केला असून दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने कथितपणे सुरू ठेवलेल्या कारवायांमुळे “विश्वासघात” झाला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील १४ कलमी करारानुसार युद्धविराम कायम राहील, असा त्यांना विश्वास आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याचा कोणताही पुरावा अमेरिकेला मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

इराणने या निर्णयाला आपल्या प्रतिसादाचे “पहिले पाऊल” असे संबोधले असून, जर कथित “आक्रमकता” सुरूच राहिली तर आणखी कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात, असा इशाराही दिला आहे. निवेदनानुसार, युद्धविराम कराराच्या पहिल्या कलमाचे उल्लंघन झाल्याचे तेहरानचे मत आहे.

यानंतर इराणच्या आयआरजीसीनेही निवेदन जारी करून होर्मुझ सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. या जलमार्गाच्या दिशेने येणाऱ्या जहाजांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे या मार्गावरील कोणताही अडथळा आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि जहाजवाहतूक बाजारांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

हे ही वाचा:

‘परिबोर्तन’ची नवी पहाट! बंगालच्या हवेत बदलाची झुळूक

नेमार पुनरागमनासाठी सज्ज; ब्राझीलला मोठा दिलासा

शिवसेना फक्त एकच, ती ही एकनाथ शिंदेचीच

ओमराजेंना धक्का; पवनराजे निंबाळकर हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

स्वित्झर्लंडमधील शांतता चर्चांच्या पार्श्वभूमीवर तणाव

शुक्रवारी इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम झाला. या संघर्षामुळे इराणशी संबंधित व्यापक राजनैतिक प्रयत्नांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ इराणबरोबर संभाव्य अणुकराराबाबत चर्चेसाठी स्वित्झर्लंडला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी या चर्चेतून माघार घेतली होती, कारण लेबनॉनमधील वाढत्या हिंसाचारामुळे चर्चेवर अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र युद्धविरामानंतर काही प्रमाणात परिस्थिती सुधारली असली तरी चर्चेच्या भवितव्याबाबत अजूनही प्रश्न कायम आहेत.

इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी सांगितले की, इराणचे वाटाघाटी पथक अमेरिकेसोबतच्या अंतरिम कराराबाबत चर्चेसाठी स्वित्झर्लंडकडे रवाना होत आहे. बघाई म्हणाले, “कोणताही सामंजस्य करार किंवा करारनामा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात गेल्यानंतरच त्याची खरी परीक्षा होते.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version