घरक्राईमनामाशरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे. आज अनिल देशमुख शरद पवार यांना दिल्लीत भेटणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन झाल्यानंतर शरद पवारांना भेटायला अनिल देशमुखही जाणार आहेत. या भेटीदरम्यान शरद पवार अनिल देशमुखांचं ‘रिपोर्ट कार्ड’सुद्धा तपासू शकतात, अशी माहिती माध्यमांकडून मिळत आहे. अनिल देशमुखांच्या कार्यपद्धतीवर शरद पवार नाराज असल्यामुळे ही भेट होणार असल्याचे समजत आहे.

सचिन वाझे प्रकरणामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारची लक्तरं काढताना जेंव्हा अनेक पुरावे सादर केले तेंव्हा गृहमंत्र्यांना या कोणत्याही विषयात काहीच माहिती नसल्याचे चित्र दिसून आले. फडणवीसांनी मनसुख हिरेन यांचे सचिन वाझेंशी कसे संबंध होते, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा पोलिसांना दिलेला जवाब या सर्व गोष्टी जेंव्हा विधानसभेत मांडल्या तेंव्हा गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांकडे या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. शिवाय माजी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या विषयाव्यतिरिक्त जेंव्हा देशमुख यांनी, रायपूर मधील एका अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केल्याचे सांगितले, तेंव्हा रायपूर मध्य प्रदेशात असल्याचे त्यांनी सांगितले होते. वास्तविक रायपूर हे छत्तीसगढमधील शहर आहे. या सर्व मुद्द्यांवरून देशमुख यांच्यामुळे सरकारची नाचक्की झाल्याचे चित्र समोर आले.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

२४ तासांत महाराष्ट्राने नोंदवले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण

सचिन वाझे प्रकरण आणि नंतर परमबीर सिंह यांची केलेली बदली या मुद्यांवरून अनिल देशमुख यांची गृह खात्यावर किती पकड आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणूनच अनिल देशमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन शरद पवार आज दिल्लीत त्यांची भेट घेऊन त्यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तपासणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version