घरराजकारण१५ मे पर्यंत 'कडक निर्बंध' कायम

१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम

राज्यात ३० एप्रिल पर्यंत लागू असलेले ‘कडक निर्बंध’ पुढेही कायम राहणार आहेत. १ मे नंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला आहे.

राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

हे ही वाचा:

दिल्लीत एनसीटी कायदा लागू, काय आहे हा कायदा?

भारतीय कोवॅक्सिन कोविडच्या ६१७ प्रकारांवर भारी

चाचण्या वाढवा, आकडा लपवू नका- देवेंद्र फडणवीस

थ्री डी प्रिंटिंगमधून उभी राहणार बिल्डिंग

राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version