घरविशेष‘गुजरात काय पाकिस्तान-बांगलादेशात आहे का?’

‘गुजरात काय पाकिस्तान-बांगलादेशात आहे का?’

परेश रावल यांचा टीकाकारांना थेट सवाल!

७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन यंदा प्रथमच दिल्लीबाहेर गुजरातमधील एकतानगर, केवडिया येथे करण्यात येणार आहे. या निर्णयावरून सध्या राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा प्रामुख्याने राजधानी दिल्लीत आयोजित केला जात होता. मात्र, यंदा २२ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमध्ये हा प्रतिष्ठेचा सोहळा होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या निर्णयावर काही राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित करत गुजरातचीच निवड का करण्यात आली, असा सवाल केला आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनस्थळाचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला आहे.
हे ही वाचा:
भारत-रशिया व्यापार २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य

३५० कोटींच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश

सुरक्षित समुद्री वाहतूक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोपरी

भारतात आयफोन डुओची किंमत तब्बल ३ लाखांवर

या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्याच्या निर्णयाचे ठामपणे समर्थन केले आहे. टीकाकारांना उत्तर देताना त्यांनी गुजरात हे भारतातीलच एक राज्य असल्याचे स्पष्ट करत, “गुजरात काय पाकिस्तान किंवा बांगलादेशात आहे का? ते भारताचाच भाग आहे,” अशा शब्दांत सवाल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आयोजनस्थळावरून सुरू असलेल्या चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. परेश रावल यांच्या मते, देशातील कोणत्याही राज्यात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात गैर काहीच नाही. त्यामुळे केवळ गुजरातमध्ये सोहळा होत असल्याच्या कारणावरून त्यावर आक्षेप घेणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. १९५४ पासून सुरू असलेल्या या पुरस्कार सोहळ्याला यंदा प्रथमच दिल्लीबाहेर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा बदल केवळ आयोजनस्थळापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पुरस्कारांच्या परंपरेत नवा अध्याय सुरू करणारा ठरू शकतो. एकतानगरसारख्या पर्यटन आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी हा सोहळा आयोजित केल्यामुळे गुजरातला राष्ट्रीय स्तरावर मोठे सांस्कृतिक व्यासपीठ मिळणार आहे. मात्र, या निर्णयावरून निर्माण झालेला राजकीय वाद अद्याप कायम असून परेश रावल यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे त्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version