अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेची (आयसा) नेता नेहा बोरा हिने पुन्हा एकदा हिंदुत्वाविरुद्ध विष ओकले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे. ब्राह्मण महिला आणि मंदिरातील पुजाऱ्यांच्या सुरक्षेबाबत नेहा बोराने असभ्य भाषेत टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
नेहा बोरा ही डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की, ‘मंदिरांमध्ये पुजारी बलात्कार करतात. ब्राह्मणवादी व्यवस्थेपासूनच सुरक्षेची गरज आहे. ही तीच व्यवस्था आहे, जी गरीब, शूद्र, पशू आणि स्त्रिया हे शिक्षेस पात्र आहेत, असे सांगते. याच व्यवस्थेमुळे ब्राह्मण महिलादेखील असुरक्षित आहेत. त्यांच्यावर बलात्कार होतात. अशा घटना आपल्याला उन्नाव आणि कठुआ येथे पाहायला मिळतात.”
हे ही वाचा:
माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक
मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
तुषार कपूर यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी
२०२९ ला मोदींसाठी राहुल गांधी यांचे रेड कार्पेट…
नेहा बोराच्या या कथित वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणावर भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, ”राहुल गांधी यांच्या पोस्टर गर्ल नेहा बोरा हिंदूंबद्दलचा आपला द्वेष व्यक्त करत आहे. ती म्हणते, मंदिरांमध्ये पुजारी बलात्कार करतात. राहुल गांधी यांच्याकडूनच त्या प्रेरित आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी मंदिरांमध्ये मुलींची छेडछाड केली जाते, असे म्हटले होते. काँग्रेसला हिंदूंचा द्वेष असून मतपेढीवर प्रेम आहे. काँग्रेसची विचारसरणी भारताच्या एकतेसाठी धोका आहे.”
भाजपने या वक्तव्याच्या आधारे काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नेहा बोरा डाव्या विचारसरणीच्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेची (आयसा) राष्ट्रीय अध्यक्ष आहे. नेहा बोराने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
