घरराजकारणराज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टीं लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्याठी राज्य सरकार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही

नाईट कर्फ्यूचे संकेत दिल्यानंतर राज्यात एकाच वेळी कर्फ्यू लागू केला जाणार का?, असा प्रश्न नागिरकांना पडत आहे. त्यावर, “राज्यभर कर्फ्यू लागू करण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधीचे अधीकार दिले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या. कोरोनाचा प्रसार, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नाईट कर्फ्यू संदर्भात तेथील जिल्हाधिकारी निर्णय घेतील. तसे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत.” असे वडेट्टीवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version