घरराजकारणनिवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी

निवडणुकांपूर्वी पाकिस्तानचे ‘आप’ प्रेम? भगवंत मान यांना व्हिसा देण्याची तयारी

लाहोरमधील जागतिक पंजाबी परिषदेसाठी निमंत्रण

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांच्याबाबत पाकिस्तानने महत्त्वाचे विधान केले आहे. लाहोरमध्ये २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जागतिक पंजाबी परिषदेसाठी मान यांना व्हिसा देण्याचा विचार करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे ‘आप’बाबतचे हे विशेष प्रेम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, मान यांचा पाकिस्तान दौरा भारत सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल.

भगवंत मान यांना या परिषदेसाठी निमंत्रण मिळाले आहे. २३ ऑक्टोबर रोजी पंजाब विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मान यांनी याबाबत माहिती दिली होती. या परिषदेला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करतानाच भारत सरकार त्यांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देईल का, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली होती. ‘आपली संस्कृती एकच आहे. पंजाबमधील अनेक कवीही या परिषदेसाठी पाकिस्तानात जाणार आहेत’, असे मान म्हणाले होते.

यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सज्जाद हैदर खान यांनी मान यांना पाकिस्तानला भेट द्यायची असल्यास त्यांच्या व्हिसाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, भारत सरकार आपल्या मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देते का, हा स्वतंत्र मुद्दा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

१० लाखांचे बक्षीस असलेला झारखंडचा नक्षलवादी ठाकुर्लीतून अटकेत

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी; ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

व्हाईट हाऊसबाहेरून तीन बंदुकांसह व्हेनेझुएलाचा तरुण अटकेत

‘रामायण’चा पहिल्या दिवशी ६५ कोटींचा धमाका

दरम्यान, प्रवक्ते सज्जाद हैदर खान यांनी करतारपूर कॉरिडॉरचाही उल्लेख केला. भारतातील डेरा बाबा नानक आणि पाकिस्तानातील करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब यांना जोडणारा हा कॉरिडॉर ७ मे २०२५ पासून भारतीय बाजूने बंद आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या बाजूने मात्र भाविकांसाठी कॉरिडॉर खुला करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version