घरविशेष‘ही घरे विकू नका, पुढील पिढ्यांसाठी सोन्यासारखी जपून ठेवा’

‘ही घरे विकू नका, पुढील पिढ्यांसाठी सोन्यासारखी जपून ठेवा’

मुख्यमंत्र्यांचे बीडीडीवासीयांना आवाहन

मुंबईतील ऐतिहासिक बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. अनेक वर्षांपासून छोट्या आणि जुन्या चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आता ५०० चौरस फुटांची प्रशस्त घरे मिळणार आहेत.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रहिवाशांना भावनिक आवाहन केले. ‘ही घरे विकू नका, तर आपल्या कुटुंबाच्या पुढील पिढ्यांसाठी सोन्यासारखी जपून ठेवा,’ असे त्यांनी सांगितले. मुंबईसारख्या शहरात स्वतःच्या मालकीचे घर मिळणे ही मोठी उपलब्धी असून, या घरांकडे केवळ मालमत्ता म्हणून न पाहता पुढील पिढ्यांसाठीचा अनमोल वारसा म्हणून पाहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
काँग्रेसला रिजिम चेंज हवाय….हा घ्या पुरावा!

दिवाळीपूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाचा विळखा

मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना पुन्हा संधी!

पर्यटनाच्या आड लश्करचे प्रशिक्षण; कराचीजवळील बेटावर दहशतवाद्यांचा वावर

ना. म. जोशी मार्गावरील प्रकल्पात एकूण १४ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार असून, त्यामध्ये २ हजार ५६० सदनिकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील तीन इमारतींमधील ५५७ घरांचे वाटप करण्यात आले आहे. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तीन ठिकाणी मिळून १५ हजार ५९३ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. दरम्यान, २०११ नंतर सेवेत दाखल झालेल्या सुमारे २२३ पोलिसांच्या घरांच्या किमतींचा पुनर्विचार करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. २०३० पर्यंत संपूर्ण बीडीडी चाळ पुनर्विकास पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version